बीड : बीड विधानसभा मतदारसंघात घडाळ्याचा गजर सुरुच असून दरदिवशी प्रवेश सोहळ्यांसह विविध संघटना, प्रतिष्ठित व्यक्तींचा उमदेवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठींबा लाभत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना.धनंजय मुंडे यांच्या सभेनंतर अनेकांचे गुरुवारी (दि.१४) समर्थन लाभले. अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलची बीडमध्ये पक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय झाला असून हा अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणार्या विरोधकांसाठी मोठा धक्का आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर यांना सर्वस्तरातून समर्थन मिळत आहे. अल्पसंख्याक समाजासोबतच मोची समाजबांधवांनी पाठिंबा दिला असून दोन्ही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. तिकडे बीडच्या आदर्श मार्केट असोशिएशनच्या पदाधिकार्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीतून व्यापारी बांधवांनी सोबत असल्याचा विश्वास दिला. रिपाइंचे (एकतावादी) राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदीसे यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष शैलेंद्र पोटभरे आणि मातृभूमी प्रतिष्ठान, ओबीसी महासंघाचे बीड शाखा अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांच्यासह सहकार्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. दरम्यान बैठका, पाठिंबा अन् प्रवेश सोहळ्यांचे सत्र सुरुच होते. या सर्व घडामोडींवरून डॉ.योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे.
मुस्लिम समाजाची सुशिक्षित, निर्व्यसनी उमेदवाराला साथ!
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. या बैठकीत अनेकांनी विचार मांडले. मुस्लिम समाजाला कुणीही गृहित धरण्याची चूक करू नये, अनेकांनी ठणकावले. मुस्लिम भागात आणखी जागरूकता निर्माण करू, विकासाच्या मुद्द्यावर मतदान मिळविण्यासाइी आपण सोबत आहोत. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या सुशिक्षित, निर्व्यसनी उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, माजी नगरसवेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.