कॉर्नर बैठकांमध्ये घेतला विरोधकांचा समाचार
गेवराई प्रतिनिधी : लोकहिताचा विचार करुन आम्ही आतापर्यंत काम करत आलो. जयभवानी सहकारी साखर कारखान्याची कार्यक्षमता वाढवून सर्व उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांच्या उसाचे बील वेळोवेळी दिले. ईतकेच नाही तर उत्कृष्ट काम करुन कारखान्याची गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल कारखाना कार्मचारी व कामगारांना रोख पारितोषिके दिली. यांची माहिती नसणारे विरोधक जयभवानी कारखान्यावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या छुप्या युतीतील चंगुमंगुला उस उत्पादक शेतकऱ्यांनी धडा शिकवावा असे आवाहन करुन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध गावात कॉर्नर बैठकांमध्ये ते बोलत होते.
महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील होनानाईक तांडा, फुलानाईक तांडा, लव्हारमळा तांडा, हनुमान नगर, रामनगर, शेलगाव थडी, माने वस्ती, कवडगाव, रिधोरी इत्यादी गावातील कॉर्नर बैठका घेतल्या. यावेळी माजी जि.प. सदस्य ॲड शरद चव्हाण, टाकरवणचे सरपंच सुनील तौर, माजी सभापती भागवत खुळे, माजी सभापती दत्तात्रय वराट, माजी सरपंच गणपत आरबे, मूरली रसाळ, रिदोरीचे सरपंच गोपाळ तौर यांच्यासह पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघात आलेला हा भाग सिंचन दृष्ट्या महत्त्वाचा असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होत आहे. या उसाचे गाळप करण्यासाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. जयभवानी सहकारी साखर कारखाना हा आपल्या मतदारसंघाची अर्थवाहिनी आहे. या कारखान्याच्या नवीनीकरणासाठी आपण सत्तेमध्ये सहभागी झालो आहोत. त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढवून या भागातील. संपूर्ण उसाचे गाळप केले जाईल. शिवछत्र परीवार हा वाडी-तांड्या पासून गाव – शहरापर्यंत सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, व्यक्तिगत पातळीवर टिका करणाऱ्या आणि निवडणूक झाल्यानंतर तोंड न दाखवणाऱ्या एका माजी आणि एका विद्यमान आमदाराला घरी बसवा आणि मला विजयी करुन विकासासाठी काम करण्याची संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष सलीम शेख, मूरलीधर लवाळे, श्रीराम कदम, हनुमान कदम, भाऊसाहेब इंगोले, रीदोरीचे उप सरपंच कृष्णा काळे, चेअरमन मुंजाबा तौर, प्रल्हाद काळे, माजी सरपंच अंकुश तौर, माजी चेअरमन बाळासाहेब मोरे, सोमेश्वर तौर, युवा नेते अमोल मनोज तौर, काळेगाव थडी चे उप सरपंच गोविंद तौर, हिवऱ्याचे सरपंच शाम ठाकूर, भाऊसाहेब माने, एकनाथ माने, सुदाम तौर, विष्णू राठोड, बन्सी राठोड, प्रकाश राठोड, दिलीप राठोड, विजय राठोड, अनंत राठोड, ज्ञानेश्वर राठोड, आबासाहेब राठोड, विश्वनाथ तौर, अंकुश तौर, सुनील तौर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयसिंह पंडित यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी महिलांना त्यांचे औक्षण करून स्वागत केले.