बीड प्रतिनिधी : बीड विधानसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मला संधी द्यावी. मतदारसंघात टक्केवारी घेणाऱ्या आमदारामुळे विकासकामे रखडली असल्याचा गंभीर आरोप महायुतीचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाळवंडी जि.प. गटातून करण्यात आला असून ढेकणमोहा येथे मंगळवारी (दि.५) सभा झाली. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.
व्यासपीठावर माजी आमदार जनार्धन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत, अरुण लांडे, सुधीर काकडे, नंदकुमार कुटे, संदीप डावकर, स्वरूप राठोड, बंडा राठोड, अच्युतराव शेळके, भिकू शिंदे, भारत कानडे, बाबासाहेब राठोड, तेजाब चव्हाण, शुभम कातांगळे, विनोद हातागळे, विद्याभूषण बेदरकर, शुभम कुलथे, मिलिंद ठोकळ, अभिमान गुंदेकर, दत्तप्रसाद सानप, रामहरी कुटे, अशोक वैद्य, अंबादास पवार, इम्रान पटेल, रघुनाथ पवार, अनिल जाधव, भगवान देवकते, बाबासाहेब काशिद, नागेश शिंदे, प्रभाकर ठिमरे, विष्णू पवार, हनुमंत बांडे, गणेश पवार, तुकाराम जाधव, दीपक सुरवसे, अनिल लोकरे आदींची उपस्थिती होती.
डॉ.योगेश क्षीरसागर म्हणले, आजची सभा ही एक नवीन पर्वाची सुरुवात असून पुढील अनेक वर्ष दिशा देणारी आहे. येणाऱ्या काळात बीड शहरासह ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. मागील एक वर्षात मतदारसंघात केलेली कामे यामुळे उमेदवारी मिळेल, याची खात्री होती. शहराच्या प्रत्येक वार्डात, गावगावात जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे त्याचे प्रश्न मार्गी लावले. माजी मंत्री जयदत्तआण्णांनी उमेदवारी मागे घेऊन एकप्रकारे आशीर्वाद दिलाय. त्यांच्या निर्णयामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल. सर्व कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागले आहेत.
टक्केवारी घेणाऱ्या आमदारामुळे बीड मतदारसंघाची कामे रखडली. आमदाराने टक्केवारीसाठी कामे अडविली. त्यामुळे अनेक विकासकामे पूर्ण झाली नाहीत. आता ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. बीड मतदारसंघातील कोरडा दुष्काळ दूर करायचा आहे. सिंचनाचा प्रश्न सोडवायचा आहे. युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. चांगले बीड, संपन्न बीड घडवायचे आहे. विरोधकांकडे कसलेच विकासाचे मुद्देच नाहीत, त्यांच्याकडून फक्त जातीपातीचे आणि धर्माचे मुद्दे मांडले जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांनी काय दिवे लावले? -भाऊसाहेब डावकर
भाऊसाहेब डावकर यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले हे सांगितले. तसेच डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची जाण असणारे, हाकेला ओ देणारे नेतृत्व मिळाल्याचे सांगितले. काकूंचा वासा खऱ्या अर्थाने डॉ.योगेश हेच चालवू शकतात. मागील पाच वर्षाची सल डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या भरून निघणार असल्याचे देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले.
डॉ.योगेशभैय्याच्या विजयाचा गुलाल उधळू – सुधीर काकडे
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचाराची सुरुवात ही गोरक्षनाथांच्या पायथ्याशी झाल्याने त्यांचा विजय कोणीच रोखू शकत नसल्याचे सांगितले. संदीप क्षीरसागर हे विरोधी उमेदवारच नाहीत. कारण त्यांच्यामुळे बीड मतदार संघाचा विकास थांबला असल्याचे सागितले. मागच्या निवडणुकीत जी चूक केली ती यावेळी करू नका सर्वांनी सतर्क राहून काम करा विजय नक्की होणार म्हणून गाफील राहू नका, येणाऱ्या २३ तारखेला डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या विजयाचा गुलाल उधळू असे सुधीर काकडे यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले.
दिवसरात्र एक करू पण योगेशभैय्यांना आमदाराच करू-बप्पासाहेब घुगे
निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अनेक जण प्रयत्न करत असताना डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट खेचून आणले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांची साथ असल्याचे सांगितले. डॉ.योगेश क्षीरसागर यांचे कुठल्याच व्यक्तीशी वैर नसून सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आमदार बनवायचे असल्याचे सांगितले. दिवसरात्र एक करू पण डॉ.योगेशभैय्यांना आमदराच करू असे सांगितले.
योगेशभैय्या सुख-दुःखात धाऊन जाणारे व्यक्तिमत्व-जनार्धन तुपे
डॉ.योगेश क्षीरसागर हे सामान्य माणसाच्या सुखा दुःखात धाऊन जाणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. हे नेतृत्व विधानसभेत गेलेच पाहिजे. संदीप क्षीरसागर यांनी मागील पाच वर्षात कसलेच कामे केली नसल्यामुळे कसलेही पद नसताना बीड मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणत निधी उपलब्ध करून विकास कमी करणाऱ्या डॉ.योगेश क्षीरसागरांचा विजय आजच निश्चित झाला असल्याचे सांगितले.