दिव्यांगांच्या हृदयातील वेदना ओळखणारा नेता म्हणजे ना.धनंजय मुंडे- डॉ.संतोष मुंडे
भव्य मोफत श्रवण यंत्र शिबिराचा घेतला १००० कर्णबधिरांनी लाभ
३७०० पेक्षा जास्त नागरिकांनी केली नवीन नावनोंदणी
परळी प्रतिनिधी : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून दिनांक ७ ऑक्टोबर व ८ ऑक्टोबर रोजी श्रीनाथ हॉस्पिटल येथे कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबीर अतिशय यशस्वी पणे संपन झाले .
तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली. अशी माहिती दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.
या भव्य मोफत शिबिराचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते झाले.
या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .थोरात साहेब,श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ एकनाथ मुंडे,बीड जिल्ह्याचे गटनेते अजयजी मुंडे,परळी तहसीलचे उपविभागीय अधिकारी लाटकर साहेब, तहसीलसर व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार रुपणर साहेब,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके ,परळी मेडिकल असो.अध्यक्ष डॉ.शालिनीताई कराड ,सचिव डॉ. मनोज मुंडे ,पवन मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटप्रसंगी बोलताना परळी हा येणाऱ्या काळात दिव्यांगांसाठी शक्य तितक्या सुविधा उपलब्ध करून देणारा मतदार संघ असेल असे धनंजय मुंडे म्हणाले. डॉ.संतोष व त्यांची टीम दिव्यांगांना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सतत शिबिरे घेत असतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
तदनंतर या शिबिराचे संयोजक दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी प्रास्ताविकात बोलताना दिव्यांगांच्या हृदयाच्या वेदना जाणून घेणार नेता म्हणजे ना.धांजय मुंडे आहेत असे उद्गार काढले .
आणि या मोफत वाटप केलेल्या १००० श्रवण यंत्राच्या माध्यमातून १००० गरजू दिव्यांगाच्या जीवनात एक अमुलाग्र बदल होईल असेही ते म्हणाले.
अशा भव्य मोफत दोन दिवसीय शिबिरामध्ये परळी मतदार संघातील तब्बल १००० कर्णबद्धिर नागरिकांना मशिनद्वारे तपासणी करून श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले .तसेच ३७०० पेक्षा जास्त नागरिकांची नवीन नाव नोंदणी करण्यात आली .
१००० श्रवण यंत्रांचे वाटप करणारे हे मराठवाड्यातील सर्वात मोठे शिबीर आपल्या परळी मतदार संघामध्ये ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून यशस्वी संपन्न झाले अशी माहिती या शिबिराचे संयोजक डिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले.
*मोबाईलचा अतिवापर टाळावा – धनंजय मुंडेंचा सल्ला*
माझा पीए कार्यक्रमाकडे येत असताना सांगत होता की मागच्या काही दिवसांपासून त्याला एका कानाने कमी ऐकायला येत आहे. सतत फोनवर बोलल्याने मोबाईलचा अतिवापर होत असल्याने मला सुद्धा एका कानाने कमी ऐकायला येते. आजच्या युगामध्ये कर्णबधीरत्व येण्यासाठी मोबाईलचा अतिवापर हे सुद्धा एक कारण बनले आहे, त्यामुळे मोबाईलवर मोजके व कामाचेच बोलावे तसेच मोबाईलचा अतिवापर टाळावा असा सल्लाही यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थितांना दिला.