विज चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी मागितली लाच
विद्युत सहायक यांच्या एसीबीने मुसक्या आवळ्या!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड ; बीड शहरातील अंकुश नगर परिसरात असलेले ते ३३/११ उपकेंद्र या ठिकाणी संबंधित तक्रारदाराच्या घरी विद्युत चोरीची तक्रार दाखल न करण्यासाठी संबंधित विद्युत सहाय्यक यांनी तक्रारदाराकडून 20 हजाराची लाच मागितली होती. तडजोडी अंती 16 हजाराची लाज घेताना आज दुपार दुपारी विद्युत सहाय्यक श्रीमती पुनम आमटे यांना एसीबीने रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बीड जिल्ह्यामध्ये लाच घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. महसूल विभाग, पोलीस विभाग यासह इतर विभागांमध्ये या लाचेच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच आता महावितरण विभाग सुद्धा मागे नसल्याचे दिसत आहे. अंकुश नगर परिसरात असलेले ते ३३/ ११ केव्हीसी उपकेंद्र या ठिकाणी असलेल्या विद्युत सहाय्यक अधिकारी श्रीमती पुनम आमटे यांनी येथील एका विद्युत धारकाला विद्युत चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. यामध्ये तडजोडी अंती आज 16 हजार रुपये घेताना आमटे यांना एसीबीने रंगेहात पकडले. या घटनेमुळे विद्युत विभागात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, मुकुंद आघाव अपर पोलिस अधीक्षक, पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – पोलीस निरीक्षक किरण बगाटे, सापळा पथक भरत गारदे , अमोल खरसाडे, सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष राठोड , अविनाश गवळी , स्नेहलकुमार कोरडे , अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी केली. शासकीय कामात कुठे अडथळा निर्माण होत असेल व कोणते अधिकारी लाचेची मागणी करत असतील तर संबंधित तक्रारदाराने बीड एसीबीसी संपर्क साधावा असे आव्हान पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी केले आहे.