बीड : सध्या खरीप हंगामाचा पंतप्रधान पिक विमा योजनेत पिक विमा भरण्याचे काम जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. पीक विमा नोंदणीत बीड जिल्हा आपणा सर्वांना अग्रेसर ठेवायचा आहे. बौड सारख्या दुष्काळी जिल्ह्यात पीक विम्याचे कवच असणे ही काळाची गरज आहे. शासनाने ही बाब ओळखून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया नोंदणी शुल्क ठेवले आहे.
बहुतांश शेतकरी हे सीएससी केंद्र चालकांच्या मार्फत ऑनलाइन स्वरुपात पीक विम्याची नोंदणी करतात. जर एखादा सीएससी चालक प्रति अर्ज एक रुपयापेक्षा अधिकची रक्कम मागत असेल अथवा घेत असेल तर त्यांच्याबाबत निःसंकोचपणे पणे प्रशासनाकडे तक्रार करावी. शेतकरी बांधव त्यांची तक्रार स्थानिक कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, जिल्हा व्यवस्थापक सीएससी, विमा कंपनी प्रतिनिधी यापैकी कुणा एका स्तरावर नोंदवू शकतात. तरी याबाबत सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
पेरलेल्या पिकापेक्षा अन्य पिकाचा पीक विमा भरला गेल्यास अर्ज रद्द होईल. तेव्हा शेतकरी बांधवांनी पेरणी केलेल्या पिकाचाच पीक विमा भरावा.
सीएससी केंद्र चालकांना जिल्हा स्तरीय प्रशिक्षण वर्गात 1रु पेक्षा कोणत्याही सबबीखाली अधिक शुल्क न घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. तरीही याद्वारे त्यांना पुनश्च आवाहन करण्यात येते की, त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का पेक्षा अधिकचे शुल्क घेऊ नये अन्यथा ते सक्त कारवाईस पात्र राहतील.
खरीप 2024 या हंगामापासून देशभरात सर्व पीक विमा विषयक तक्रारी साठी एकच टोल फ्री क्रमांक 14447 करांच्या सोयीसाठी ठेवण्यात आला आहे याचीही शेतकरी बांधवांनी नोंद घेऊन सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री अविनाश पाठक जिल्हाधिकारी, बीड हे करत आहेत.