पवनसुत निवासस्थानी नागरिकांनी केली गर्दी
केज :- आठवडाभरानंतर खासदार बजरंग सोनवणे हे जिल्ह्यात दाखल होताच त्यांच्या केज येथील पवनसुत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तर त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रचारात त्यांनी एक खासदार काय असतो ? हे दाखवून देऊ अशी ग्वाही दिली. त्याची प्रचिती यावरून दिसून येत आहे.
बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष जाणते राजे खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते मुंबई येथे गेले होते. त्यानंतर ते वरिष्ठांच्या आदेशानुसार मुंबई येथेच होते. सोमवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमाला त्यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला फेटा बजरंग सोनवणे यांना घालत जायंट किलर असा उल्लेखही केला. तर बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणात आपण आगामी विधानसभेसाठी मराठवाड्यात मोठी मोर्चेबांधणी करू व यश मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला.
आठवडाभरानंतर खा. बजरंग सोनवणे हे केजमध्ये पोहचले. मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या पवनसुत या निवासस्थानी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. ऍक्शन मोडवर असलेल्या सोनवणेंनी आलेल्या नागरिकांनी अडचणी ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी अनेक अधिकारी वर्गाना फोन करीत त्या समस्या सोडवण्याच्या सूचनाही केल्या. आपली अडचण समजून घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बाप्पानी संपर्क केल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.