जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा डोअर टू डोअर प्रचार ..!
बीड प्रतिनिधी : 39- बीड लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात बीड शहरातील जिजामाता चौक, जवाहर कॉलनी, शिक्षक कॉलनी, बसस्थानकच्या मागील परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचार रॅली काढून डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. या प्रचार रॅलीत जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिप सदस्य अशोक लोढा, विक्रांत हजारी, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत फड, ओमप्रकाश गिरी, भूषण पवार, दादासाहेब ननावरे, लालासाहेब पन्हाळे, बालाजी पवार, बद्रीनाथ जटाळ, राजू शहाणे, केशव बडे, लालासाहेब पन्हाळे, अॅड संगीता धसे, मीराताई गांधले, डॉ जयश्रीताई मुंडे, छायाताई मिसाळ, लताताई राऊत, उज्वल कोटेजा यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असून , पंकजाताई यांना निवडणून आणण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई,रासप, मनसे सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. डोअर टू डोअर प्रचार करून, पूर्ण मतदार संघ पिंजून काढण्याचा छंद कार्यकर्त्यांनी हाती घेतला असून आज बीड शहरात डोअर टू डोअर प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सुरु केला आहे. थेट मतदारांशी संवाद साधून पंकजाताईंच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. या डोअर टू डोअर रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या कामाविषयी मतदार बांधव खुश आहेत. त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची तीव्र इच्छा नागरिकांची असल्याने कमळ चिन्हावर मतदान करून पंकजाताईंना प्रचंड मतांनी विजय करण्याचा विश्वास मतदार बांधव देत आहेत.