बीड : 39 बीड लोकसभा मतदारसंघात आज छाननी चा दिवस असून 55 उमेदवार वैध घोषित झालेली आहेत तर छाननी अंती 19 उमेदवार बाद ठरली आहेत.
18 ते 25 एप्रिल सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज वाटपाची तसेच सादर करण्याची वेळ होती. या कालावधी दरम्यान एकूण 74 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल केले होते.
आज छाननी अंती 19 उमेदवार बाद ठरले असून 55 उमेदवार वैध नामनिर्दिष्ट उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत.
पंकजा गोपीनाथ मुंडे, भारतीय जनता पक्ष, बजरंग मनोहर सोनवणे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, सिद्धार्थ राजेंद्र टाकणकर, बहुजन समाज पक्ष, अशोक भागोजी थोरात, बहुजन महापार्टी, अशोक सुखदेव हिंगे, वंचित बहुजन आघाडी, अंकुश रामा खोटे, भारतीय जवान किसान पार्टी, करुणा मुंडे, स्वराज्य शक्ती सेना, चंद्रकांत कुमार हजारे, महाराष्ट्र विकास आघाडी, जावेद सलीम सय्यद, टिपू सुलतान पार्टी, ताटे महेंद्र अशोक, आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टी, भीमराव जगन्नाथ दळे, अखिल भारतीय परिवार पार्टी, माणिक बन्सी आदमाने, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, मुक्ता भिमराव दळे, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल, रविकांत अंबादास राठोड, समनक जनता पार्टी, शरद बहिनाजी कांबळे, ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेना, शेषेराव चोखोबा वीर, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी,
अपक्ष वैध उमेदवार उदयभान नवनाथ राठोड , कस्पटे गणेश व्यंकटराव, गणेश नवनाथराव करांडे, गणेश भाऊसाहेब कोळेकर, गफ्फार खान जब्बार खान पठाण, गोकुळ बापूराव सवासे, गंगाधर सिताराम काळकुटे, जावेद सिकंदर मोमीन, तुकाराम विठोबा उगले, दत्ता सुदाम गायकवाड, नाजेम खान जब्बार खान पठाण, पाराजी तुळशीराम आगे, प्रकाश भगवानराव सोळंके, भास्कर किसन शिंदे, भास्कर बन्सी खांडे, मुबीन जुबेरी झहीर उल अफ्राक, मुस्तफा मैनोदिन शेख, राजेंद्र अच्युतराव होके, रासवे संतोष उत्तम, रेहमान बाहोद्दीन सय्यद, लक्ष्मीबाई बाजीराव मोरे, वचिष्ठ उद्धव कुटे, वसीम शे. सलीम शेख, विनायक तुकाराम गडदे, शितल शिवाजी धोंडरे, शेख एजाज शेख उमर, शेख तौसिफ अब्दुल सत्तार, शेख याशेद शेख तय्यब, श्रीराम विठ्ठलराव खळगे, सतीश पद्माकर कापसे, संमशेरखाँ साहेबखाँ पठाण, सय्यद मिनहाज अली, सलाउद्दीन खान पठाण, सलीम अल्लाबक्ष सय्यद, सादेक इब्राहिम शेख, सादेक हुसेन मोहम्मद, सारिका बजरंग सोनवणे, सुलेमान खैरोद्दिन महमद, हिदायत सादेख अली सय्यद. अशी अपक्ष उमेदवारांची नावे आहेत.
29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.