संभाजीनगर : गेल्या काही दिवसापासुन शिवसेना पक्षामधील शिवसैनिक, शिवसेना नेते आणि उपनेते यांच्या मनातील खदखद आणि नाराजी मी प्रा्रतिनिधीक स्वरुपामध्ये व्यक्त केलेली आहे. ज्यांनी आपले राजकिय जिवन पणाला लावून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सोबत केली. त्यांना मुख्यनेता मानुन नेतृत्व स्वीकारले पण दूर्दैवाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारीही मिळवता आलेली नाही. एका अर्थाने त्यांचे राजकिय बळी गेलेले आहेत, मित्रपक्षाच्या राजकिय दबावामुळेच त्यांचे बळी गेले अशी भावना माझ्या सहित शिवसैनिकांची झालेली आहे.
मा. मनोज जरांगे पाटील यांची फसवणुक असो किंवा परशुराम आर्थक महामंडळ प्रश्नी ब्राम्हण बांधवांची फसवणुक असो किंवा धनगर बांधवाना झुलवत ठेवणे असो याच्या केंद्रस्थानी कोणता पक्ष आहे हे महाराष्ट्र जाणुन आहे.
“भाजपाचा एकच मंत्र, दबाव तंत्र”, याचा अनुभव शिवसेना घेत आहे. हेच शल्य शिवसैनिकासाठी बोचणारे आहे.
शिवसैनिकांच्या खांद्यावर बसुनच भाजपा सत्तेची फळे चाखत आहे. याचा विसर मात्र त्यांना पडलेला आहे. मा. एकनाथ शिंदेजी यांनी उठाव केला म्हणुन सत्तेच्या पालखीत बसण्याचा मान भाजपाला मिळाला. अभूतपूर्व असे सत्तांतर घडले. चमत्कारीक सत्तांतराचे सर्वेसर्वा फक्त एकनाथ शिंदेजी हेच आहेत हे मित्र पक्षांनी विसरु नये.
आता राहतो प्रश्न शिवसेनेचा. शिवसेनेमध्ये चर्चा आणि संवाद यांना पूर्ण विराम दिलेला दिसतोय. पक्षा मधील वरीष्ठ पातळीवरील नेतृत्व भावनांची दखल घेतांना दिसत नाही. मी मांडलेल्या भावना योग्य कि अयोग्य याचीही दखल पक्षाला घ्यावी वाटलेली नाही. याचा अर्थ पक्षामधील संवादाची दारे बंद झालेली आहेत.
मित्रपक्षाचा दबाव पक्ष नेतृत्व झुंगारेल असे आता वाटत नाही. कदाचीत पक्ष नेतृत्वाची काही अडचन असु शकेल. मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे “प्रभूरामचंद्र” मित्रपक्षा पासुन संरक्षण करोत अशी प्रार्थणा करतो आणि पक्षाला रामराम ठोकतो.