१६० कामांच्या मंजुरीसाठी महावितरणकडे मागणी
बीड प्रतिनिधी :- बीड विधानसभा मतदारसंघाला वीज वितरण सुरळीत व्हावे, याकारिता आ.संदीप क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील असतात. आताही उर्जा विभागाच्या आर.डी.एस.एस. योजनेंतर्गत बीड मतदारसंघात विविध ठिकाणी १६० कामांना मंजुरी मिळण्यासाठी आ.क्षीरसागर प्रयत्न आणि पाठपुरावा करत आहेत. याविषयी आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
बीड मतदारसंघातील नागरीक, शेतकरी, उद्योजक यांच्यासाठी मुलभूत असलेला प्रश्न म्हणजे वीजपुरवठा. मतदारसंघात वीजपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना वीजेसंबंधी अडचण येऊ नये, याकरिता आ.संदीप क्षीरसागर लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने पाठपुरावा, प्रयत्न करत असतात. शेती, उद्योग तसेच घरगुती वापरासाठी वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बीड मतदारसंघाला अखंडीत वीजपुरवठा व्हावा यासाठी आ.क्षीरसागर यांनी उर्जा विभागाच्या आर.डी.एस.एस. योजनेंतर्गत बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील विविध १६० ठिकाणी विद्युत उपकेंद्र, रोहीत्र व पोल लाईन बसविणे इत्यादी कामांना मंजुरी व निधीची मागणी केली आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्यासह महावितरणच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन प्रस्ताव दाखल केले आहेत.
नवीन सबस्टेशसह, रोहीत्र व पोल बसविण्याची केली मागणी
बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात बीड व शिरूर का. तालुक्यात अखंडीत वीजपुरवठा होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील नाळवंडी नाका, पाली, आहेर धानोरा याठिकाणी नवीन सबस्टेशन मंजूर करण्याची मागणी केली आहे. तर बीड व शिरूर तालुक्यात विविध १६० ठिकाणी नवीन रोहीत्र, पोल लाईन व इतर वीजपुरवठ्यासाठी आवश्यक असलेली कामे मंजूर करण्याची मागणी केली आहे.