Beed : आज दि.०८ रविवार रोजी पहाटे सकाळी साडे ५ वाजता पुणे ते नांदेड एसटी बस क्रमांक एम.एच.१४- ०७४२ अहमदनगर ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील एसटी लिंबागणेश बसस्थानक येथे रस्त्यावरून शेतात घसरली.जखमींना राष्ट्रीय रूग्णवाहिका द्वारे बीड जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
पुणे ते नांदेड एसटी गाडीचा लिंबागणेश बसस्थानक येथे अपघात झालाअसुन एसटी राष्ट्रीय महामार्गावरून सचिन वाणी यांच्या टोमॅटोच्या शेतात घसरली.गाडीमध्ये १५ प्रवासी प्रवास करत होते.अपघातात अनिता विक्रम थोरात वय ४० वर्षे रा.खडकीघाट यांच्या कमरेच्या मणक्याला मार लागला आहे,विक्रम यदा थोरात वय ५० वर्षे ५० यांना व राधाकिसन श्रीहरी कदम वय ४५ वर्षे यांना डोक्याला मार लागला आहे.रघुनाथ कोंडीबा थोरात वय ५० वर्षं याचे डाव्या हाताचे बोट तुटले असुन शिवशाला महादेव रासकर वय ६० वर्षे रा.भारज यांना पायाला मार लागला असुन त्यांना रूग्णवाहिकेतुन बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एसटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यावेळी लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव, विक्रांत वाणी, रोहित तागड,बबलु आबदार,शहादेव ढास व डॉ.गणेश ढवळे यांनी जखमींना रुग्णालयात पोहचवण्यास सहकार्य केले. वाहनचालक एम.आर.गावडे यांना डुलकी लागल्याने अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि.विलास हजारे यांना फोनवरून कल्पना दिल्यानंतर नेकनुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळपंचनामा करण्यात आला आहे.