पाच ट्रॅक्टर केणीसह एक ट्रॅक्टर ट्रॉली,एक दुचाकीसह दोन मोबाईल असा एकूण अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल केला जप्त.
बीड प्रतिनिधी : गेवराई पथकाचे प्रमुख गणेश मुंढे चे पथक वाळू तस्कराचे कर्दनकाळ ठरू लागले आहेत.दोन दिवसापूर्वीच गोदावरी पात्रात एक कोटी साठ लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आज दुपारी गुप्त माहिती च्या आधारे मुंडे च्या टीमने चकलांबा हद्दीतील गुंतेगाव ट्रॅक्टर केणी,एक ट्रैक्टर ट्रॉली, एक आरोपी
सह एक मोटारसायकल २ मोबाईल असा 50 लक्ष रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेवराई तालुक्यातील गोदावरीच्या नदीपात्रात अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.या भागात तस्करांचा नंगानाच चालवलेला आहे,मोठया प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती गणेश मुंडे यांना मिळाली असता दुपारी आपली टीम घेऊन नदीपात्रात धडक कारवाई केल्याने वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत.या भागत वाळू तस्करी,उपसा अनेक दिवसापासून खूप मोठया प्रमाणात होत होता परंतु कारवाई कोणीच करत नव्हते.पोलीस अधीक्षक पथकप्रमुख ए.पी.आय.गणेश मुंढे यांची नियुक्ती केल्यापासून वाळू तस्करावर कारवायात वाढ झाली आहे.API गणेश मुंडे सह विष्णू वायवसे,महिला पो.कर्मचारी स्वाती मुंडे सह दंगल पथकातील कर्मचाऱ्यानि ही कारवाई करत एक आरोपी ट्रॅक्टर 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या हद्दीतील पोलीस ठाणें व तहसीलदार काय करतात?असा प्रश्न उपस्थित होत आहें.गणेश मुडे व टीम हें वाळू व पत्त्याच्या क्लबवर कारवाई केल्याने वाळू तस्करात खळबळ माजली आहे.