परळी वैद्यनाथ तालुक्यातील पौळ पिंप्री, नागपिंप्री, ईरिगेशन कॉलनी व हेळंब या सबस्टेशन उभारणीस महावितरण कडून मंजुरी
जुन्या पावर हाऊसची क्षमता होणार दुप्पट, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर व अन्य मागण्याही मंजूर
परळी वैद्यनाथ : – कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील महावितरण कडील वीज पुरवठ्या संदर्भातील विविध सबस्टेशन उभारणी, सुरू असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढविणे आदी मागण्यांना यश आले असुन, परळी तालुक्यातील पौळ पिंप्री, नागपिंप्री, ईरिगेशन कॉलनी व हेळंब या चार ठिकाणी 1×5 MVA क्षमतेचे सबस्टेशन उभारणीस व क्षमता वाढीच्या अशा एकूण 150 कोटींच्या कामांना महावितरणने मंजुरी दिली आहे.
परळी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या जुन्या पावर हाऊसच्या क्षमतेत देखील 5 MVA वरून 10 MVA अशी दुप्पट वाढ करण्यास मंजुरी देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.
परळी तालुक्यातील संगम, गोवर्धन, मोहा, काळरात्री देवी, सिरसाळा, जलालपूर व सारडगाव या सबस्टेशनच्या ठिकाणी अतिरिक्त पावर ट्रान्सफॉर्मर देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आर डी एस एस अंतर्गत तालुक्यातील 160 किमी उच्चदाब वाहिनी साठी एक तसेच 57 किमी लघुदाब वाहिनी साठी एक असे एकूण दोन 100 KVA क्षमतेच्या रोहित्रांना देखील मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे वेगाने पूर्ण केली जातील व त्यामुळे संबंधित गावांना व परळी शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी ना. धनंजय मुंडे यांचे व महावितरणचे आभार मानले आहेत.