मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
Beed : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तहसील कार्यालयात चित्र प्रदर्शनीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त तहसील कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे चित्र प्रदर्शन तहसीलदार बीड आणि जिल्हा माहिती कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी शनिवारी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तहसीलदार सुहास हजारे तसेच इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चित्र प्रदर्शनी मध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या वीरांची छायाचित्रांसह त्यांनी केलेल्या शौर्याची कथा मांडण्यात आली.
प्रदर्शनी पुढील काही दिवस यांसाठी सर्वांसाठी खुली असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्यांची महती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.