बीड : धारुर परिसरात दुचाकी आडवी लावून लुटमारी करण्याच्या घटना वाढल्या होतो, याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतिमान केला होता. अखेर या टोळीच्या मुसक्या आवळ्यात स्थानिक गुन्हे शाखेले यश आले आहे. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांच्या टिमने हि कामगिरी केली.
दिनांक 22/08/2022 रोजी 20.00 वा. चे सुमारास चांभार तळ तांडयाचे पुढे आसोला ते पिंपरवाडा रोडवर घाटात पिंपरवाडा शिवारात फिर्यादी नामे श्रीकिसन कारभारी तिडके रा.पिंपरवाडा ता.धारुर व त्यांची भावजाई हे मो.सा.वरून जात असतांना अचानक मागुन स्कॉर्पिओ गाडीने मोटार सायकलला आडवी लावून अनोळखी आरोपींनी भावजाई यांना मो.सा.वरून खाली ओढून चाकुचा धाक दाखवून गळयातील सोन्याचे दागिने व फिर्यादीचे हातातील सोन्याचे दोन अंगठया व रोख रक्कम 19000/- रु असा एकुण 115000/- रु चा मुद्येमाल जबरीने चोरी करून लुटून नेला होता. यावरुन पो.ठा.धारुर येथे गुरनं 269/2023 कलम 392,341,34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दिनांक 02/09/2023 रोजी उक्त गुन्हयातील आरोपींचा संमातर शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री. संतोष साबळे यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे बारकाईने विश्लेषण करून गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पिंपरवाडा घाटातील शिवारात घडलेली घटना ही इसम नामे भिमा लक्ष्मण मस्के रा.बलभिमनगर व त्याचे इतर साथीदाराने केली असून ते खंडेश्वरी मंदिराजावळ स्कॉर्स्पीओ गाडीमध्ये बसले आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळताच पोउपनि श्रीराम खटावकर सोबत स्टाफसह तात्काळ नमुद ठिकाणी रवाना होवून भिमा मस्के यास शिताफीने ताब्यात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्हयात आरोपी नामे 1) भिमा लक्ष्मण मस्के वय 38 वर्षे रा.बलभिमनगर वत्तारवेस बीड , 2) नाना सुदाम सुतार वय 38 वर्षे रा. पुरगस्त कॉलनी बीड, 3) बबलु उर्फ अंबादास रामदास वीटकर वय 24 वर्षे रा.बलभिमनगर बीड यांना ताब्यात घेवून गुन्हयात वापरलेली स्कॉर्स्पीओ गाडी जप्त करण्यात आली आहे. एक फरार आरोपीचा शोध घेणे चालु आहे.
आरोपी नामे भिमा लक्ष्मण मस्के याचे गुन्हे अभिलेख पाहतो तो बीड जिल्हयाचे अभिलेखावरील हिस्ट्रीशिटर असून त्याचेवर दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे मालाविरुध्दचे गुन्हे करण्यास सराईत आहे. त्याचेवर एकुण 77 गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. तसेच आरोपी नाना सुदाम सुतार हा देखील घरफाडीचे गुन्हे करण्याचे सवईचा असून अभिलेखावर गुन्हे दाखल आहेत.
तीन आरोपीतांना पो.स्टे. धारुर यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचेकडून मालाविरुध्दचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पो.ठा.धारुर व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड, मा.अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, सफौ/सलीम शेख, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे,पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि/सचिन आंधळे अश्विनकुमार सुरवसे, चापोशि/अशोक कदम सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.