बीड- बीड शहरातील नागरिकांच्या सहकार्याने नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून बीड नगरपालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हागणदारी मुक्त अभियानात मराठवाड्यात बीड नगरपालिकेला ओडीएफ प्लस प्लस चे मानांकन मिळाले असून मराठवाड्यातील अ वर्ग दर्जाची पालिका म्हणून बीडला मानांकन मिळाले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे
स्वच्छता अभियानात बीड नगरपालिकेने देशपातळीवर आणि राज्य पातळीवर सहभाग नोंदवला होता त्यातही नगरपालिकेला मोठे यश मिळाले त्यानंतर स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हागणदारी मुक्त अभियान राबविण्यात आले होते दिनांक 14 फेब्रुवारी रोजी एका पथकाकडून बीड शहराची पाहणी करण्यात आली होती अभियानांतर्गत पाहणी करत असताना बीड शहरात ज्या ज्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत त्या ठिकाणची पाहणी पथकाने केल्यानंतर पथकाने समाधान व्यक्त केले मराठवाड्यात अ वर्ग दर्जाची पालिका म्हणून बीडचा समावेश आहे
शहरातील नगरपालिकेने उत्कृष्ट काम केल्याबद्दल मानांकन मिळाले आहे ओ डी एफ प्लस प्लस या मानांकनामुळे बीड नगरपालिका आता स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशपातळीवर देखील सामावेश होण्यासारखे काम करेल असा विश्वास नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे
अभियान यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे इंजि, राहुल टाळके, युवराज कदम यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे