प्रारंभ वृत्तसेवा
बीड : अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक याठिकाणी गेल्या तीन महिन्यापुर्वी एका 35 वर्षीय युवकाला चौघांनी आडवूण त्यांच्या खिशातील मोबाईल व काही रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील आरोपी अंबाजोगाईत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टिमने केली.
अंबाजोगाई येथील रहिम चाँद शेख (वय 35 वर्षे व्यवसाय मिस्त्री रा. गांधीनगर अंबाजोगाई) हे अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक येथून जात असताना, त्यांना दोन दुचाकीवरुन येणाऱ्या चौघांनी आडवूण त्यांच्या खिशातील एक मोबाईल व सहा हजार रुपये लंपास केले होते. यासह त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर यातील आरोपी जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतिमान केला होता. यातील आरोपी अंबाजोगाईत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर यातील दोन आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. करण कृष्णकुमार गायके (रा. केज) व सौरभा सदाशिव मुळे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचे अजून दोन साथीदार विजय तुकाराम वाटुरे रा. नांदेड, शुभम गवळी रा. सिरसाळा ता. परळी यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. ताब्यातील आरोपींना अंबाजोगाई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस सचिन पांडकर, अप्पर पोलीस कविता नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे व पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली.