जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची संकल्पना
बीड, : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधून दर सोमवारी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा दिली जात आहे. यामुळे जिल्हाभरात या उपक्रमाबाबत सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
या उपक्रमांमधून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक पद्धतीने जनजागरण होताना दिसत आहे. दर सोमवारी शाळांमधून या प्रतिज्ञाचे सूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.राज्यातील जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. असे बालविवाह रोखण्यासाठी 8 मार्च 2023 या महिला दिनाचे निमित्त साधून बालविवाह निर्मूलन आराखडा तयार करण्यात आला याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे मुलींचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व मुलाचा विवाह २१ वर्षानंतर करण्याबाबत ही प्रतिज्ञा आहे.
यासोबतच जनजागृतीच भाग बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी शाळा, अंगणवाडी केंद्रे, पोलीस स्टेशन तहसील कार्यालय, पंचायत समिती या ठिकाणी चाईल्ड लाईन क्रमांक दहा 1098 दर्शनी भागावर पेंट करण्यात आला आहे. जिल्हा कृती दलाच्या दर महिन्याला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक शाळेत दर सोमवारी शालेय परिपाठामध्ये बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिल्या आहेत.
(बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा) आम्ही बिडकर अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाह प्रत्यक्षात व अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा 1098 या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनी ठेवले जाते याची मला माहिती आहे. या सामाजिक कामासाठी आम्ही प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त बीड जिल्हा. जय हिंद जय महाराष्ट्र
याप्रमाणे शालेय परिपाठात दर सोमवारी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्याची कार्यवाही सर्व शाळात चालू आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईन क्रमांक दहा 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुधीर ढाकणे बीड यांनी केले आहे.