• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
July 25, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा!

मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकार प्रयत्नशील – धनंजय मुंडेंची विधानपरिषदेत माहिती

कृषी पासून गृह विभागापर्यंतच्या चर्चेला धनंजय मुंडेंचे उत्तर

मुंबई – ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली.

सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नियम 260 अन्वये उपस्थित चर्चेच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते.

आज सकाळीच माहिती घेतली असता, राज्यात या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिकविमा भरला असून, ही संख्या दररोज 6 ते 7 लाखांनी वाढत आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना पीकविमा योजना अधिक सोयीची झाल्याचे स्पष्ट होते, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण मिळत आहे तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार मिळून वर्षाला *12 हजार रुपये* शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेत्यांसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना धनंजय मुंडे यांनी पीएम किसान सन्मान योजनेतून बोगस पद्धतीने पैसे उचललेल्या खोट्या शेतकऱ्यांच्या विषयावर देखील मत व्यक्त केले. जो शेतकरी नाही, पण पैसे उचललेत अशा लोकांकडून केंद्र सरकार वसुली करत असल्याची माहिती मुंडेंनी दिली.

दरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या पिक कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या उर्वरित लाभाबाबत धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, पुरवणी मागण्यांमधून या रकमेची तरतूद करण्यात आली असून, 15 ऑगस्ट पर्यंत या रकमा वितरीत केल्या जातील.

बोगस बियाण्यांच्या तक्रारींबाबत घोषित केल्याप्रमाणे कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू असून, कालच मंत्रिमंडळ उपसमितीची यासंदर्भात बैठक झाल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी 5 हजार गावांचा समावेश करण्यात येत असून, जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपावे, यादृष्टीने वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी आजच्या चर्चेदरम्यान कृषी विभागासोबतच जलसंपदा, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, गृह आदी जवळपास 15 विभागाच्या चर्चेला राज्य सरकारच्या वतीने उत्तर दिले. अत्यंत अभ्यासपूर्ण तसेच व्यापक माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी सदनात मांडली.

Previous Post

बीड शहरात स्पा पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीसांची कारवाई

Next Post

जिजाऊ मल्टीस्टेट पाठोपाठ गेवराईमधील ही अर्बन निधी बँक बुडाली

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
जिजाऊ मल्टीस्टेट पाठोपाठ गेवराईमधील ही अर्बन निधी बँक बुडाली

जिजाऊ मल्टीस्टेट पाठोपाठ गेवराईमधील ही अर्बन निधी बँक बुडाली

Beed : पोलीसांची पाटोद्यातील गांजा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

Beed : पोलीसांची पाटोद्यातील गांजा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

beed : श्रीमंतयोगी मल्टीस्टेटचे चेअरमन अजित काळे यांनी प्रारंभशी संपर्क साधून केलेला खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा