जिजाऊ मल्टीस्टेट ठेविदारांचा आक्रोश मोर्चा ..!
हक्काच्या लढ्यात ठेवीदरांनी बहुसंखेने सहभागी व्हावे..!
बीड प्रतिनिधी : जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी बीड ठेवीदरांचा आक्रोश मोर्चा बुधवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 11.00 वा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष ॲड. अप्पासाहेब जगताप यांनी दिली आहे.
जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी गेली बावीस वर्षापासून बीड मध्ये कार्यरत आहे. साधारण पंधरा हाजार ग्राहक आणि जवळपास 160 कोटींच्या ठेवी असलेली ही मल्टीस्टेट बीड व परिसरातील गाव खेड्यापर्यंत परिचित आहे. भांडे घासणाऱ्या महिलेपासून, ते निवृत्त कर्मचारी अधिकारी, व्यापारी, शेतकरी व गोरगरिबांच्या बचतीचा पैसा ठेवी रुपात ठेवलेला आहे.
अध्यक्षा सौ. अनिता बबनराव शिंदे यांच्या कुटुंबाने हजारो ठेवीदारांचा अक्षरशः विश्वासघात करून, जनतेचा पैसा लुबाडला. गेली तीन महिन्यापासून जिजाऊ मल्टीस्टेट मुख्य शाखा व इतर शाखाही बंद आहेत. शाखा बंद होण्यापूर्वी अनेक ठेवीदार अनेक दिवसापासून ठेवीची रक्कम मागत आहेत. परंतु पैसे देण्यास असमर्थ ठरले. ॲड. संतोष जगताप यांनी 19 जून रोजी फिर्याद दिली अखेर सील लागले. अफरातफरिचा आकडा लक्षात घेता. प्रशासनाकडून गंभीर कारवाई होताना दिसत नाही. यामुळे ठेवीदारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, पैसे परतीसाठी गोरगरीब जनता धडपडत आहे. आज आशीर्वाद लॉंन्स बीड येथे ठेवीदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस अप्पासाहेब जगताप, सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकराव हिंगे, ॲड. रवींद्र देशमुख, ॲड. श्रीराम लाखे, ॲड. सुशील सरपते, सुहास पाटील, मारुतीराव तिपाले, शेख कुतुब भाई, संजय आगलावे, सुभाष तांदळे, शशिकांत तांदळे, शिवाजीराव शिंदे, निवृत्तीराव शेळके,अयुब याकुब शेख, इंजिनियर मारोतीराव वनवे, रवींद्र पालीमकर, फारूकी रईस, बाळासाहेब घुमरे, आकाश भड, साहेबराव खिंडकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी महिला पुरुषासह सर्व जाती धर्मातील ठेवीदार हजारोच्या संखेने उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान कृती समिती निर्माण करून कायदेशीर लढा न्यायालयात लढण्याचे निश्चित करण्यात आले. व शासन व प्रसासनाने या घोटाळ्याची गांभीर्याने दखल घेऊन जनतेचा पैसा परत करण्यासाठी कठोर पाउले उचलावीत. या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी 11.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. या मोर्चात सर्व ठेवीदारांनी सहभागी होऊन आपल्या हक्काचा लढा यशस्वी करावा असे आवाहन कृती समितीने केले आहे.