‘धनंजय मुंडे तुम आगे बढो, बळीराम गवते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा
बीड/प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दि.१३ रोजी प्रथमच धनंजय मुंडे बीडमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघाचे नेते बबनराव गवते, सभापती बळीराम गवते यांनी त्यांच्या स्वागताचे जंगी नियोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आल्यानंतर ‘धनंजय मुंडे तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ म्हणत जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत के्रनद्वारे पुष्पहार घालण्यात आला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांच्यावर बीड मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.धनंजय मुंडे दि.१३ रोजी प्रथमच बीड येथे येणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले हाते. गेल्या चार दिवसांपासून या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. मंत्री धनंजय मुंडे हे दुपारी ३ वाजता बीडमध्ये आले असता जवळपास अर्धातास फटाक्यांची अतिषबाजी करत जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. गवते यांनी केलेले स्वागताचे नियोजन पाहून धनंजय मुंडे भारवून गेले होते. या नागरी सत्कार सोहळ्यासाठी बीड मतदारसंघातील गावागावातून कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, युवक अध्यक्ष नंदकुमार कुटे, पंचायत समिती सभापती बळीराम गवते, पंचायत समिती सदस्य मोहन देवकते, उत्तरेश्वर सोनवणे, किशोर सुरवसे, किशोर वायसे, कांता शिंदे, गुंडीबा नवले यांची प्रमूख उपस्थिती होती. बळीराम गवते यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना विठ्ठलाची मुर्ती देत सत्कार केला. यावेळी ‘धनंजय मुंडे तुम आगे बढो, बळीराम गवते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
३ क्विंटलचा पुष्पहार
बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बळीराम गवते यांच्या वतीने ना.मुंडे यांना घालण्यासाठी तब्बल तीन क्विंटल फुलांचा हार आणण्यात आला होता. तर पाच क्विंटल फुलांची उधळण जेसीबीच्या सहाय्याने केली. जिल्हा परिषद समोरील रस्त्यावर अक्षरश: फुलांचा सडा पडला होता.
हलक्यांचा कडकडाट
मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतावेळी फटक्यांच्या अतिषबाजीसह हलकी पथक आणि ढोलपथकाने अक्षरश: कडकडाट केला. गावागावातून येणारे कार्यकर्ते हलकी वाजवत येताना दिसले. यापुढे आम्ही केवळ गवतेंच्या सोबत असू, अशा विश्वासही कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.