लवकरच पंकजाताई मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता?
पंकजाताई भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता
भाजपाकडून पंकजाताईंवर नेहमीच अन्याय झाल्याने कार्यकर्ते नाराज
राज्यात पंकजाताईंना मानणारा मोठा वर्ग
तार्इंनी राजकीयदृष्ट्या निर्णय घेतला तर राज्यातील चित्र पलटू शकते
तार्इंनी आताच निर्णय घेतला तर 2024 ची परिस्थिती वेगळी असेल
पंकजाताईंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
वारंवार पंकजाताईंची कोंडी करणाऱ्या नेत्यांना ताईंच्या निर्णयाने बसणार धक्का
प्रारंभ । वृत्तसेवा
Beed : गेल्या दिड वर्षापासून राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर बनली असून कोणता राजकीय गट किंवा कोणता राजकीय पक्ष कधी फुटेल व कोणाला पाठींबा देईल याचा काही नेम नसल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. तर दुसरीकडे नेहमीच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना भाजपाने सत्तेपासून दूर ठेवलेले आहे. एकेकाळी राज्यामध्ये भाजपाचा डोलारा डोक्यावर घेत भाजपाला सत्तेत स्थान देणारे स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील तळागळापर्यंत भाजपा पोहोचवली होती. परंतु त्यांच्याच कन्या पंकजा मुंडे यांना मात्र भाजपाकडून नेहमीच डावलण्यात आल्याच्या घटना आपण सर्वांनी पाहिल्या आहेत. त्यात अजित पवार हे मोठा आमदाराचा गट घेवून सत्तेत सहभागी झाल्यामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी एक रणनिती आखली असून लवकरच त्या मोठा निर्णय घेवून राज्याला हादरा देणार असल्याची शक्यता आहे. पंकजाताई या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यामुळे मात्र पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं बोललं जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना-भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. यातच धनंजय मुंडे यांनी थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. पण याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगितलंय, तसंच पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असंही नाना पटोले यांनी सांगितलं.