पेठ बीड पोलीसांची मोठी कारवाई; पोलीस अधिक्षकांनी टिमचे केले अभिनंदन
प्रारंभ न्युज
बीड : 20 लाखाच्या बदल्यात एक कोटी देतो म्हणत पेठ बीड भागातील एकाची वीस लाखाची फसवणूक केली होती. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात भामट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणीचा तपास करताना पेठ बीड पोलिसांना अनेक अडचण येत होता, परंतु पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलेल्या सूचनेनुसार पेठ बीड पोलिसांनी तपास गतिमान करत, कोणताही पुरावा नसताना भामट्यास जेरबंद केले. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकरे यांनी या टीमच्या अभिनंदन केले आहे.
पोलीस ठाणे पेठ बीड येथे फिर्यादी नामे गोरख आसाराम भटे वय 29 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. बाभळवाडी ह.मु.स्वराज्य नगर बीड यांनी दिनांक 27/06/2023 रोजी पोलीस ठाणे पेठ बीड येथे फिर्याद दिली की, दिनांक 14-06/2023 ते 18/06/2023 दरम्यान वेळोवेळी मोबाईल क्रमांक धारक 7083037925 याने फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन नाशिक करन्सी येथे माझा मावस भाऊ आहे. नाशिक करन्सी येथे शेवटची प्रेसेस राहिलेल्या ख-या नोटा आपल्याला मावस भावामार्फत 1 कोटीला चार कोटी मिळतात व त्या पैश्यातुन मी अर्बन बँकेला फंडीग करतो असे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन सॅम्पल म्हणुन फिर्यादीस पाचशे रूपयाच्या तिन व शंभर रूपयाच्या तिन नोटा देवून त्या नोटा व्यवहारात वापरण्यास सांगितल्या फिर्यादीने त्या व्यवहारात वापरल्यानंतर त्या व्यवहारात चालल्यानंतर फिर्यादीचा आरोपीच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने आरोपीने फिर्यादीस 20 लाख रुपयाच्या बदल्यात एक कोटी रुपये देतो असे सांगुन त्याने व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादीस बीड वरून उस्मानाबाद येथे बोलावून उस्मानाबाद शहरात बस स्टँड समोर फिर्यादीकडून 20 लाख रुपये घेवुन त्या बदल्यात फिर्यादीस एक कोटी रुपये आहे असे म्हणुन फिर्यादीस को या वहया पैशाचे बंडले असे भासवुन पॅक करुन देवुन 20 लाख रुपयाची फसवणुक केली. वगैरे मजकुराच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन पेठ बीड गु.र.नं. 151/2023 कलम 420.34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हाचा तपास करत असतांना आरोपीने वापरलेला मोबाईल बंद केल्याने व सदर क्रमांक हा दुस-याच व्यक्तीच्या नावे असल्याने आरोपी शोध लागत नव्हता. त्यामुळे मा. पोलिस अधिक्षक साहेब यांनी गुन्हाच्या तपासाबाबत विशेष सुचना दिल्या होत्या त्यांच्या सुचनेप्रमाणे वेगवेगळे तपास पथक नेमुन घटनेच्या ठिकाणापासुन बीड ते उस्मानाबाद दरम्यानचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर मिळालेल्या एका धाग्याच्या अधारे तपासाची चक्रे फिरवून तपास केला असता आरोपीने गुन्हयात वापरलेल्या गाडीची कंपनी निष्पण करून त्या आधारे तपास करून गुन्हयातील आरोपी नामे महेश शिवाजी खाडप रा. लखमापुर पोष्ट मोरवड ता. रेणापुर जि.लातुर यास निष्पण केले. व पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोशि 1557 सांगळे, पोशि/1987 गिरी अशांनी पोस्टे बर्दापुर जिल्हा बीड हद्दीत जावुन सापळा लावला असता आरोपी महेश शिवाजी खाडप वय 29 वर्षे रा. लखमापुर ता. रेणापुर हा मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली. परंतु सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी यास पोलीस ठाणे पेठ बीड येथे आणुन सदर गुन्हयामध्ये त्यास मा. न्यायालया समक्ष हजर करुन त्याची सहा दिवसाची पोलीस कोठडी घेवुन त्याच्याकडे गुन्हयाचा तपास केला. तपासामध्ये पोलीस कोडडीमध्ये असताना सदर आरोपीने गुन्हयामध्ये फसवणुक केलेले 20 लाख रुपये दोन पंचासमक्ष काढुन दिले आहेत. सदर आरोपीकडुन 20 लाख रुपये व गुन्हयात वापरलेली कार क्रमांक MH 24 AW 4147 ही जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी यास गुन्हयात अटक करून पोस्टे पेठबीड गुरनं.151/2023 कलम 420,34 भादवी गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीने या प्रकारे बीड जिल्हातील अनेक निधी अर्बन बँकेच्या व्यवस्थापकांना संपर्क करून एक कोटीच्या बदल्यात तीन कोटी रूपये देण्याचे अमिष दाखविल्यानचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. वरील कामगिरी मा. पोलिस अधिक्षक श्री. नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलिस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रामचंद्र पवार, पोउपनि संदीप जाधव, पोलीस कर्मचारी सुभाष मोठे, श्री कॉस्टेबल, श्री बिबिशन सांगळे, श्री औदुंबर गिरी, श्री विष्णु गुजर, श्री बालाजी बास्टेवाड यांनी केली आहे.