आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांसाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक करणार रुग्णसेवा.
बीड प्रतिनिधी – आषाढी एकादशी निमित्त धाकट्या पंढरीत लाखो भाविक येत आहेत. त्यांना कुठलीही आरोग्य विषयक अडचण गैरसोय निर्माण होणार नाही. यासाठी जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासनाने प्रथमच यावर्षी धाकटी पंढरी म्हणजे नारायण गड या ठिकाणी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, व नारायण गडाचे सर्व विश्वस्त व बळीराम गवते , सी ए.जाधव यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्य च्या दृष्टीने सर्व सोयी उपयुक्त आरोग्य यंत्रणे सह तज्ञ डॉक्टरांचा स्टाफ धाकट्या पंढरीत आरोग्य सेवा देणार आहे.
आषाढी एकादशी च्या निमित्ताने धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण गड या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक भक्तासह वारकरी, आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने येतो. त्यांच्या आरोग्याची काळजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री मा. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, व नारायण गडाचे सर्व विश्वस्त यांच्या संकल्पनेतून कोणत्याही भाविक भक्ताला आरोग्य विषयक अडचण जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा तज्ञ डॉक्टर स्टाफ वारकऱ्यांसाठी रुग्णसेवा देणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने वारकऱ्यांच्या रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून सर्व सोयी उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक उपचार ओपीडी बेसवर उपलब्ध असणार आहे जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासना च्या धाकट्या पंढरीत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना रुग्ण सेवा केली जाणार आहे. कोणताही भाविक भक्ताला आरोग्य विषयक कुठलीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी डॉक्टरांची टीम धाकट्या पंढरीत रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहे.