स्थानिक गुन्हे शाखेत कोणाची लागणार वर्णी?
ग्रामीण ठाणे, शिवाजीनगर, शहर ठाणे, अंभोरा, पाटोदा ठाणे येथील ठाणेदार बदलणार
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या पीआय, एपीआय, पीएसआय यांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड शहर पोलीस ठाणे, बीड ग्रामीण ठाणे, पाटोदा पोलीस ठाणे, अंभोरा पोलीस ठाणे यासह इतर ठाणेदारांच्या बदल्या ईद व आषाढीनंतर करण्यात येणार आहेत. बीड पोलीस विभागातील महत्त्वाची शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा याठिकाणी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यात ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये पीआय, एपीआय, पीएसआय यांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये नव्याने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असून काही जॉईल झाले आहेत तर काही बाकी आहेत. हे सर्व अधिकारी जॉईन झाल्यानंतर यांना संबंधित ठाण्यात नियुक्त्या देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे बीड स्थानिक गुन्हे शाखेला कोणाची वर्णी लागणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत साबळे की चाटे ?
पोलीस विभागात महत्त्वाची असणारी शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांची संभाजीनगर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.संतोष साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यासह परळी पोलीस ठाण्याचे पो.नि.सुरेश चाटे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे.