ग्राहकांचा विश्वास अन् पारदर्शक सेवेमुळे राज्यात ओळख
बीड / प्रतिनिधी : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये बॅंकींग सेवा देणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बीड येथील मुख्य कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन सोमवार दि.१२ रोजी करण्यात आले होते. यावेळी १७५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासली.
आपल्या तत्पर,विनम्र आणि पारदर्शक सेवेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या मराठवाड्यातील पहिली ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑप सोसायटीच्या वतीने ग्राहकांसाठी विविध सेवा पुरविल्या जात आहेत. राज्यासह देशभरात ५३ शाखांच्या माध्यमातून ज्ञानराधा संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील ग्राहकांना बॅंकींग सेवेत जोडून बॅंक आपल्या दारी यासह विविध उपक्र म राबवून आज लाखो ग्राहक बॅंकेशी जोडले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे कॉपोरेट ऑफीस, बीड शहरात भव्य इमारतीमध्ये मुख्य कार्यालय असून गेल्या १७ वर्षांपासून ज्ञानराधा ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर यशस्वीपणे कार्यरत आहे. ‘सहकारातून समृध्दीचा, आम्ही जपतो वारसा विश्वासाचा’, हे ब्रीद वाक्य घेवून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत ज्ञानराधा संस्थेने १८ व्या वर्षांत पर्दापण केले आहे. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवित १५० पेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले. या शिबिरासाठी जिल्हा रूग्णालयातील रक्तपिढीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी, टेकनिकेशियन नितीन सोळंके, सचिन सतकर, खेडकर, गायकवाड, दादा कुमकर, दिलीप औसरमल, विक्र म शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. तर बॅंकेचे चेअरमन सुरेशराव कुटे यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी यावेळी उपस्थित होते.