बीड प्रतिनिधी : माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर व आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वात शेतकरी, व्यापारी व हमाल मापाडी यांच्या उज्वल भविष्यासाठी शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले की, मार्केट समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे त्यामुळे आदरणीय जयदत्त आण्णांनी शेतकऱ्यांच्या पुत्रांनाच उमेदवारी दिली आहे. मराठवाड्याला माजी मंत्री जयदत्त आण्णा शिवाय पर्याय नाही. कारण सध्या त्यांच्या एवढा अनुभवी आणि कुशल नेतृत्व असणारा नेता दिसत नाही. आण्णांच्या नेतृत्वाखाली चालत असलेली बाजार समिती चोरांच्या हातात देऊ नका. विरोधक स्वतः चे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आपण मात्र मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विकासासाठी, हितासाठी लढा देत आहोत. मागील ३५ ते ४० वर्षात कोणाला टक्केवारी मागितली नाही किंवा कोणाला त्रास दिला नाही. बाजार समितीला गुटखा, वाळू, मटक्याचा अड्डा होण्यापासून वाचवायचं असेल बाजार समितीच्या सुज्ञ मतदारांनी शेतकरी विकास पॅनल च्या मागे उभे राहावे. बाजार समितीचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल निवडणूक लढवत आहे. बाजार समितीच्या पारदर्शक कारभारासाठी, शेतकरी व व्यापारी यांच्या सुरक्षेसाठी शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना छत्री या निशाणीवर ठसा मारून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन देखील बीड नगर पालिकेचे मा.नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.

















