मतदारांच्या भव्य मेळाव्याने शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित
पाटोदा प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा व शिरूर संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलचा भव्य मेळावा दि.२६ रोजी गारमाथा डोंगरकिन्ही येथे आयोजित करण्यात आला होता..मतदारांच्या भव्य मेळाव्याने भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित झाल्याचे चित्र मतदारांच्या गर्दीवरून लक्षात येत होते.
यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यात द्या याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा व शिरूर संचालक मंडळाचे निवडणूक दिनांक ३० रोजी असून या संदर्भात शेतकरी विकास पॅनलचा मतदारांचा भव्य मेळावा दिनांक २६ रोजी गार माथा येथे आयोजित केला होता. यावेळी अजय धोंडे. तात्यासाहेब हुले, दशरथ वनवे,आप्पासाहेब राख,वैजनाथ मिसाळ, रामराव खेडकर, सुरेश उगलमुगले,भरत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, या बाजार समितीच्या इमारतीसाठी पाटोदा व शिरूर येथे पणन मंडळाकडून मी राज्यमंत्री असताना सहा कोटी रुपये दिले असून या मागील काळात कर्मचाऱ्यांचे पगारही व्यवस्थित होत नव्हते शिरूर तालुका हा सेपरेट बाजार समिती हवा पाहिजे मात्र सध्या आर्थिक सुस्थिती आणावी लागेल तरच ती सेपरेट करण्यात येणार असून यासाठी बाजार समिती सक्षम करण्यासाठी सर्वांनी काम करावे तसेच बाजार समितीकडे जाणारे सर्व रस्तेही आज चांगल्या दर्जाचे झाले असून त्या परिसरात असणारी शाळा नेमकी कोणत्या जागेत आहे याचीही चौकशी आता करावी लागणार आहे त्याचप्रमाणे विरोधकांनी व्यापारी मतदारसंघात चार गावात तीनशे मतदान वाढवले असून तर दोनशे मतदान हमाल मतदार संघात ही त्यांनी वाढवला आहे.बनावट कागदपत्रे करुन तरी हि बाजार समिती चुकीच्या माणसाच्या ताब्यात ही संस्था जाऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घेणे काळाची गरज आहे या बाजार समितीमध्ये असणारे जवळपास २१ प्लॉट हे परस्पर विकली असून यामध्ये डिपॉझिट ही कसल्याही प्रकारची कुठे नोंद न करता विरोधकांनी गायब केल्या असून नेमका हा विकलेला पैसा गेला कुठे याचीही चौकशी होणे काळाची गरज असून त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदार बंधूंना विनंती की शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्केट कमिटी ताब्यात द्या असे यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जि.प.सदस्य माऊली जरांगे यांनी केले तर प्रस्ताविक माजी सभापती महेंद्र गर्जे यांनी केले तर आभार सुधीर घुमरे यांनी मानले