बीड प्रतिनिधी- बीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 या होवू घातलेल्या निवडणुकीत
विरोधी पॅनलचे जे प्रमुख आहेत त्यांचे राईट हॅन्ड जोगदंड नावाचे गुत्तेदार शासनाची फसवणूक करून खोटे कागदपत्र जोडून गुत्तेदारीची कामे मिळवल्यामुळे व भ्रष्टाचार केल्यामुळे शासनाच्या काळ्या यादीत गेलेले आहेत. लवकरच ह्या जोगदंड महाशयांवर गुन्हे देखील दाखल होतील. कालच बीड नगर परिषदेमध्ये एलईडी लाईट्स मध्ये पाच कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न फसला. बीड शहरामध्ये 23 मीटर मध्ये 18 एलईडी पोल लावण्याची किमया हे महाशय करणार होते. याचाच अर्थ प्रत्येकी एक मीटरवर एक पोल कागदोपत्री दाखवून पाच कोटींचा मलिदा यांना लाटायचा होता. तो आम्ही हाणून पाडला. बीड पंचायत समितीमध्ये 17 कोटींच्या घोटाळ्यात हे पॅनल प्रमुख व त्यांचे पीए गायके फरार होते. हेच प्रकरण स्वर्गीय मेटे साहेबांनी विधिमंडळात देखील लावून धरले होते. आज स्वर्गीय मेटे साहेब हयात असते तर हे पॅनल प्रमुख जेलमध्ये दिसले असते.
यासोबतच अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करून त्यांच्यावर दबाव टाकून कोट्यावधी रुपयांचा निधी लाटणे, काहीतरी तोड पाणी करून आपलं उखळ पांढरं करून घेता येईल म्हणून अधिकाऱ्यावर दबाव टाकून यांच्या मर्जी शिवाय रजिस्ट्री ऑफिस मध्ये रजिस्ट्री होऊ न देणे. सर्वसामान्यांचे फेरफार रोखून तोडपाणीचे प्रकार सर्रास सुरू आहेत, यांनी व यांच्या एका पीए ने जिल्हा परिषदेमध्ये 1000 शिक्षक बदलीचा घोटाळा केला होता. तोच पीए आज देखील यांच्यासोबत आहे. जलजीवनच्या महाघोटाळ्यामधला मास्टरमाईंड देखील हेच महाशय आहेत. गाव पातळीवर थेट येणारा दलितवस्ती व पंधरावा वित्त आयोगाचा निधी रोखून त्यांच्या वर्क ऑर्डर दहा-वीस टक्के घेऊन वाटण्याचे प्रकार आज देखील सुरू आहेत. याला ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्य बळी पडलेले आहेत. या सर्वांमधून एकच गोष्ट सिद्ध होते ज्या ज्या वेळी या व्यक्तीच्या हातात एखादी संस्था गेली त्या त्या वेळी या व्यक्तीने ती संस्था मोडून तोडून चुरून खाण्याचाच प्रकार या व्यक्तीकडून घडलेला आहे.
त्यामुळे विषाची परीक्षा न घेता बाजार समितीला टक्केवारीचा अड्डा होण्यापासून वाचवायचं असेल तर वरील सर्व गंभीर बाबींचा विचार करून जागरूक मतदार बंधू भगिनींनी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर व लक्ष्मण अण्णा पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या नावापुढील छत्री या चिन्हावर शिक्का मारून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अमर नाईकवाडे यांनी केले आहे.
*चौकट*
*शेतकऱ्यांची मातृ संस्था भ्रष्ट माणसापासून वाचवा.*
विरोधी पॅनलचे प्रमुख यांनी स्वतःची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या संस्था चुरून खाल्ल्यानंतर हे महाशय आता शेतकरी व व्यापाऱ्यांची मातृसंस्था असलेल्या बाजार समितीचा मसनवाटा करण्यासाठी निघालेले आहेत. त्यामुळे जागरूक मतदारांनी या भ्रष्ट माणसाला दूर ठेवून पुन्हा एकदा माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या नावापुढील छत्री या चिन्हावर शिक्का मारून आपली बाजार समिती वाचवावी असे आवाहन अमर नाईकवाडे यांनी केले आहे.