सत्तापरिवर्तन करण्यासाठी मतदारांनी निवडणूक घेतली हाती
40 वर्षे सत्ता देऊनही प्रलंबित प्रश्न आहे तसेच, जिल्ह्यातील सर्वात कमी दरात बीड बाजार समितीत, मतदारांनी सत्तापरिवर्तन करण्यासाठी बाजारसमितीची निवडणूक घेतली हाती
प्रारंभ । वृत्तसेवा
गेल्या चाळीस वर्षांपासून बीड बाजारसमितीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सत्ता असून 40 वर्षाच्या कार्यकाळात जयदत्त आण्णांना म्हणाव असे काम बीड बाजार समितीत करता आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना याठिकाणी आजपर्यंत तरी न्याय मिळालाच नाही. बीड बाजार समितीच्या तुलनेत माजलगाव बाजार समिती, कडा बाजार समिती यासह इतर ठिकाणच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जास्त दर मिळतो पण बीडमध्ये कमी यामुळे येथील शेतकरी त्यांचा शेतमाल विकण्यासाठी बीड बाजार समितीत न जाता जिल्ह्यातील इतर बाजारसमितीमध्ये जावे लागत आहे. मग 40 वर्षे एकहाती सत्ता देवून नेमका विकास कोणाचा झाला असा सवाल मतदारांमधून उपस्थित होत आहे. अण्णा तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागताय असा सुद्धा संतप्त सवाल उपस्थित होवू लागला आहे. बीड बाजार समितीमध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बीड बाजारसमिती की मसनवाटा असा प्रश्न बीड बाजार समितीत गेल्यानंतर उपस्थित होतो, बीड शहरापासून जवळच असलेल्या नवीन मोंढा परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बाजार समिती उभारण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुद्धा ती बाजारसमिती का मसनवाटा असा प्रश्न निर्माण होत असेल तर आपण अंदाज लावू शकतो की, सत्ताधाऱ्यांनी याठिकाणी नेमका विकास केला कोणाचा? शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना याठिकाणी न्याय मिळत नसेल तर ही बाजारसमिती काय कामाची, विकलेल्या मालाची पट्टी नियमानुसार दोन तासाच मिळविणे गरजेचे असते, परंतु बीड बाजारसमितीमध्ये शेतकऱ्यांना पट्टी आठ-आठ दिवस मिळत नाही. पट्टीसंदर्भात विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मात्र मिळतात. तब्बल 40 वर्षे एक हाती सत्ता असून सुद्धा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना बीड बाजार समितीचा म्हणावा असा विकास करता आलेला नाही यामुळे अण्णा तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागताय असा संतप्त सवाल मतदार उपस्थित करू लागले आहेत.
सत्तापरिवर्तनासाठी मतदारांनी निवडणूक घेतली हाती
बीड बाजार समितीतील अनागोंदी कारभार रोखण्यासाठी व याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी बाजारसमितीत असलेल्या गाळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व बीड बाजार समिती विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी होवू घातलेली बाजारसमितीची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली असून यावेळेस सत्तापरिवर्तन करण्यासाठी मतदार आता कामाला लागले आहेत.