बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आ.अमरसिंह पंडित बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात उतरले असून काल संदीप भैय्यांच्या मदतीला अमर‘सिंह’ धावून आले असून कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानाच्या अनुषंगाने पिंपळनेर, बहिरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये झंझावती दौरा करून शेतकरी परिवर्तन महाआघाडीला निवडुण देण्याचे आवाहन करतांना म्हणाले की, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीमध्ये प्रस्थापित जपान, युक्रेन, युएस च्या समस्या बळीराजाला सांगत आहेत. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही प्रस्थापितांनी विकासाच्या नावाखाली केलेली फसवणुक जनतेसमोर आहे.गेल्या चाळीस वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्थापितांनी शेतकरी बांधवांना थापा मारून राज्य केला असून हे रावणराज्य उद्धवस्त करण्यासाठी बळीराजा च्या पाठीशी पुर्ण ताकदीनिशी उभा राहून कप बशी ची या चिन्हावर फुलीचा ठसा मारून शेतकर्याच्या पोराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर बसवावे असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेससह बीड मतदार संघातील 3 लाख 60 हजार मायबाप जनता हे माझे कुटुंब सदस्य असून भविष्यात हेच कुटुंब सदस्य मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझे प्रतिनिधित्व करतील. माझ्या घरात तीन लाख साठ हजार आईबाप भाऊ बहीण आहेत.आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतृत्व माजी आ.अमरसिंह पंडित साहेबांनी आज बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात उडी घेतली असून सिंहाच्या या झडपा मुळे विरोधक मतदारसंघातून नव्हे तर जिल्ह्यातून हद्दपार होतील यामध्ये दुमत नाही. याप्रसंगी अमरसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी, ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे, कल्याण काका आखाडे, शेकापचे बाळासाहेब घुमरे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. तर यावेळी सुनिल पाटील, शेख निजाम, राजेंद्र आमटे, उमेदवार शामराव पडुळे, उद्धव पैठणे, धनंजय गुंदेकर, फड नितीन, ज्ञानेश्वरी काळकुटे, व्यापारी मतदार संघाचे उमेदवार केशव गायकवाड यांच्या आदींची उपस्थिती होती. तसेच बहिरवाडी, पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील आजी,माजी सरपंच,उपसरपंच, सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामस्थ, शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.