Beed : अगदी सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या हिताचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
बीड येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, चंद्रकांत नवले, जिल्हा संघटक योगेश नवले, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकर्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पुढे बोलताना सचिन मुळूक म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी, महिला, युवक-युवती, कामगार, शिक्षणसेवक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, पत्रकार, उद्योगक्षेत्र व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी अर्थसंकल्पात प्रचंड भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणून केंद्रबिंदू ठेऊन जाहीर केला आहे, असे मत जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केले. त्यांनी जिल्हावासीयांच्यावतीने युती सरकारचे आभार मानले.