जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटांच्या इमारतीची केली पाहणी; काम दर्जेदार करण्याच्याही दिल्या संबंधितांना सूचना
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड शहरातील जिल्हारुग्णालयापाठीमागील दीप हॉस्पिटल ते रिपोर्टरभवनकडे जाणार्या डीपी रस्त्याचे काम नगरोत्थान अंतर्गत सुरू असून जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षण भितीमुळे रस्ता होण्यास अडथळा होण्यास निर्माण झाला होता यामुळे हे काम बंद होते. याच अनुषंगाने आमदार संदीप क्षीरसागर यांनी बंद असणार्या कामाच्या ठिकाणी भेट देवून संबंधित अधिकार्यांना
योग्य त्या सूचना देत ते काम तात्काळ सुरू केले. यामुळे हे काम सुरू झाले असून लवकरच नागरिकांना हा रस्ता वाहातुकीसाठी खुला होणार आहे. यासह जिल्हा
रुग्णालयातील 200 खाटाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून या कामाचीही त्यानी यावेळी पाहणी करत संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह इतर अधिकारी
व पदाधिकारी उपस्थित होते. बीड शहरातील दीप हॉस्पिटल परिसरातील डीपी रोडचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता, सध्या हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होत असून जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीमुळे रस्ताकामास अडथळा निर्माण झाला होता. आज याठिकाणी आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट देवून येथील सर्व बाबींची सविस्तर माहिती घेवून या रस्त्याचा मार्ग निकाली काढला. यासह त्यांनी जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटाच्या इमारतीचे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयामध्ये भविष्यात एकूण सहाशे खाटांचे भव्य दिव्य असे जिल्हा
रुग्णालय होणार आहे. हे जिल्हा रुग्णालय राज्यातील मोजक्याच रुग्णालयात मोडणार आहे. यामुळे येथील सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या सुविधा आता जिल्हा रुग्णालयातच मिळणार असून त्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर हे पुढाकार घेत आहेत.