जिल्ह्यात पाच हजार एक्कर तुती लागवड करण्याचा जि.प.चा संकल्प
आज पाच वाजता मुख्याधिकारी अजित पवार तांदळवाडीला देणार भेट, शेतकर्यांशी
साधला संवाद
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड जिल्हा हा विकासापासून दूर असलेला जिल्हा असल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी म्हणावा तसा सक्षम झालेला नाही. यामुळे येथील शेतकर्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. याच अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अजित पवार यांनी जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास करून जिल्ह्यातील शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. जिल्ह्यातील शेतकर्यांनी पारंपारिक शेती बरोबर आधुनिक शेती केली तर जिल्ह्यातील शेतकरी नक्कीच सक्षम होतील असे मत प्रारंभशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले. यावर्षी जिल्ह्यात पाच हजार एक्कर तुती लागवड करण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प असून गेल्यावेळेस एक हजार एक्कर प्रति लागवडीचे ध्ेयय ठेवण्यात आले होते परंतु याला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 1600 एक्कर तुती लागवड झाली. यावेळी हेच ध्येय जास्त ठेवून जिल्हा परिषद काम करत आहे. आज तांदळवाडी येथे 101 एक्कर तुती लागवड झालेली असून त्याठिकाणी मुख्याधिकारी अजित पवार भेट देवून तेथील शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या कष्टाने पिकांची लागवड करतात परंतु त्यांच्या हाती कायम निराशा येते, यामुळे येथील शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्येसारखा मार्ग अवलंबितात, जिल्ह्यातील शेतकर्यांना जर योग्य मार्गदर्शन केले तर येथील शेतकरी भक्कमपणे उभा राहून स्वत: सक्षम होवू शकतो परंतु आजपर्यंत येथील शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी म्हणावे असे प्रयत्न झालेले नाहीत. परंतु गेल्या काही वर्षापासून सोशल मिडियाच्या माध्यमातून किंवा इतर माहितीच्या माध्यमातून येथील शेतकरी सक्षम होण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामुळेच बीड जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपारिक शेतीबरोबर आधुनिक शेती सुद्धा करू लागले आहेत. याच अनुषंगाने आता जिल्हा परिषद सुद्धा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी विशेष प्रयत्न करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना मुळात शेतीची आवड असल्यामुळे त्यांचा कल शेतकर्यांकडे जास्त आहे. येथील शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी सुद्धा ते विशेष पुढाकार घेत आहेत. सध्या जर पाहिले तर तुती लागवडीकडे शेतकरी जास्त वळत असून याला एकरी साडेतीन लाख रुपयाचे अनुदान सुद्धा आहे, या लागवडीमुळे शेतकरी सक्षम होवू शकतो. जास्तीत जास्त जर याची लागवड जिल्ह्यात झाली तर येथील शेतकर्यांना सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे. याच अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार बीड जिल्ह्यात काम करत आहेत.