डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी केली दीप हॉस्पिटल ते थोरात वाडी सुरू असलेल्या सिमेंट रस्ते आणि नाला कामाची पाहणी
बीड प्रतिनिधी : बीड शहरातील दीप हॉस्पिटल ते थोरात वाडी या सिमेंट रस्ता आणि मोठा नाला बांधकाम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाची युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी पाहणी केली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्रमांक दोन ची कामे शहरात सुरू आहेत. माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि मा.नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.आज डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह दीप हॉस्पिटल,थोरात वाडी या सिमेंट रस्ता व नाली बांधकामाची पाहणी केली.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरातील अनेक विकासाची कामे झाली आहेत. ड्रेनेज, पाईपलाईन, सिमेंट रस्ते आणि नाल्यांची दर्जेदार कामे झाली आहेत. ही समाधानाची बाब आहे.नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत. शहराच्या विकासात मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून प्रश्न सोडवत असल्याचे सांगितले. या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती.स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्यावर दवाखाने, शाळा असल्याने यारस्त्यावरून अनेक वाहने ये जा करतात. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने तयार करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात हा रस्ता चांगला राहील. शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अधिकारी,कंत्राटदार यांना दिले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सादेक जमा, गणेश वाघमारे, सभापती विनोद मुळूक, रवींद्र कदम, इकबाल शेख, अक्रम बागवान, जमील शेख, शारेक झकेरिया, बाबा खान, जलील शेख, बाळासाहेब घोडके, खलील शेख, ईश्वर धनवे, प्रमोद शिंदे, अमोल गलधर, रोहन गुजर, गोरख काळे, सफवान खान,अहमद सिद्दीकी, शहेबाज शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.