पाटोदा : तालुक्यातील मौजे.सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थांवर थर्माकोलवरून शाळेत जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली. होती. रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चप्पु चलाओ आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेत आ.सुरेश आण्णा धसा शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थांच्या मदतीला धावून आले असून त्यांनी अंदाजे ३ लाख रूपये किंमतीच्या ३ तराफा ग्रामस्थांना भेट दिल्या असुन त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थोडासा सुखकर झाला आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास थांबवल्याबद्दल आ.सुरेश आण्णा धस यांचे आभार : – बाबु शिंदे (ग्रामस्थ)
वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर रस्त्याच्या मागणीसाठी २ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जिल्हाप्रशासनाला निवेदन दिल्यानंतर दि.११ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकुन तराफे जाळल्यानंतर शालेय विद्यार्थांवर थर्माकोलवरून शाळेत जाण्याची वेळ आली त्याचवेळी ३ मुलं पाण्यात पडल्याची घटना घडली होती. आ.सुरेश आण्णा धस यांनी याची दखल घेऊन ३ लाख रूपये किंमतीचे ३ तराफे ग्रामस्थांना भेट दिले आहेत त्याबद्दल शिंदेवस्तिवरील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थांच्यावतीने आभार.
तहसिलदार यांच्या हलगर्जीपणामुळे ३० लाख रूपये निधी महिन्यापासून अखर्चित:- डाॅ.गणेश ढवळे
जलसमाधी आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांनी ३० लाख रूपये निधी गटविकास आधिकारी पंचायत समिती पाटोदा सुमित जाधव यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी वर्ग करण्यात आला असून एका शेतक-याने अडवलेला रस्ता तहसिलदार यांनी मोकळा करून दिला नाही त्यामुळेच ३० लाख रूपये निधी अखर्चित असुन तहसिलदार रूपाली चौगुले यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी दि.१९ डिसेंबर सोमवार रोजी डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांनी शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चप्पु चलाओ आंदोलन ” करण्यात आले होते. त्याची दखल घेत आ.सुरेश आण्णा धस यांनी शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची तराफे देऊन जीवघेण्या थर्माकोलवरील प्रवासातुन सुटका केली आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन