बीड प्रतीनिधी : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त 12 डिसेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे बीड येथे आयोजन करण्यात आले होते. परंतु राज्यात सुरु असलेल्या लम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने बैलगाडी शर्यतीस परवानगी नाकारली आहे. यामुळे 12 डिसेंबर रोजी घोषित केलेली बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसा निमित्त 1 जुलै 2022 रोजी बीड येथे भव्य बक्षिसासह बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु शर्यती दरम्यान कोसळलेल्या पावसामुळे शर्यत पूर्ण होऊ शकली नाही. अखेर आयोजक पंच व बैलगाडा शर्यत स्पर्धक यांच्या सहमतीने हीच शर्यत नव्याने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त शर्यत आयोजित करण्याचे घोषित केले होते. परंतु सध्या देशासह राज्यात पशूंचा लम्पी स्कीन संसर्गजन्य आजार गाव, वाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. लम्पीचा गंभीर प्रादुर्भाव बीड जिल्ह्यातही पसरला असून, काही शेतकऱ्यांचे जनावरे दगावली आहेत. लम्पी आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने बैलगाडा शर्यतीचे परवानगी नाकारली आहे. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.