वंचित बहुजन आघाडीच्या विष्णू मुंडेंच्या साथीला – शिवशक्ती सेनेचा पाठिंबा
परळी प्रतिनिधी / परळी शहरापासून जवळच असलेली टोकवाडी ग्रामपंचायत निवडणूक रिंगणामध्ये सरपंच पदाच्या उमेदवार विष्णू मुंडे हे वंचित बहुजन आघाडी नेते आहे वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश पासून त्यांनी अनेक धडाकेबाज कामे केली आहेत, गावातील रोड नाल्यांचे प्रश्न असतील, स्वच्छतेचा प्रश्न असेल, दारूबंदी, अवैध धंदे, राखेचे प्रदूषण, संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना, गावातील अडीअडचणी, तालुक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यापर्यंत मांडून, त्यासाठी अविरतपणे काम चालू आहे, आदर्श गाव टोकवाडी ची दारू बंद करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, अवैध धंदे देखील जवळजवळ बंद झाली आहे, त्यांनी अनेक मोर्चे निदर्शने धरणे आंदोलने केली आहेत, गावाच्या विकासासाठी ते सातत्याने रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांची कामे करत आहेत, त्यांच्या या कामाची माहिती मिळाल्या नंतर शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे -शर्मा यांनी दखल घेतली व संपर्क केला व त्यांना संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला, त्यांच्या प्रचाराला देखील असल्याची माहिती सांगितली आहे. निवडणुकीत रंगत वाढली आहे,अनेक दिवसा पासून शांत असलेल्या करुणा मुंडे बीड सह राज्यातही सक्रिय झाल्या आहे परळी तालुक्यातील टोकवाडी या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने परळी तालुक्यातील गावात प्रचारासाठी येणार असल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमातुन दिलेल्या एका व्हिडिओ मध्ये त्या बोलताना दिसत आहे, त्या बीड शहरात घर घेतल्या पासून अनेक जण प्रकाश आहेत व भेटीगाठी देखील घेत आहे, त्याचे समर्थ संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्याकडे भेटण्यासाठी येत आहेत, बीड येथील त्यांच्या निवासस्थानी विष्णू मुंडे यांची भेट झाली व त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला येणार असल्याची माहिती दिली आहे.शिवशक्ती सेनेच्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे या गावातील निवडणूक रंगतदार होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहे,अनेक वेगवेगळे मुद्दे मांडतील त्यामुळे बैठकांना व सभेला गर्दी होय परंतु प्रस्थापितांची सध्या धाबे दणाणले दिसत आहेत.