केमिकलयुक्त पाण्याने नदीपात्रात शेकडो मासे मरण पावले
बीड/प्रतिनिधी
बिंदुसरा नदी पात्रातील पाणी दूषित झाले असून या पाण्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडले असून नदीकाठी तरंगताना दिसत आहेत केमिकल युक्त पाण्यामुळे नदीपात्रातील ग्रामस्थांना धोका होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन पाहणी करण्याची मागणी केली जात आहे
बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी दूषित पाण्यामुळे धोक्याची ठरू लागली आहे शिदोड परिसरात या नदीपात्राच्या पाण्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत नदीतील पाणी हे अनेक ठिकाणाहून एकत्र येऊन ते शिदोड मार्गे पुढे जाते शिदोडे येथे साचलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे लालसर रंगाचे पाणी केमिकल युक्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे हे दूषित पाणी शेतीला वापरले आणि जनावरांनी पिले तर हजारो जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून याची दखल घ्यावी नदीपात्राच्या आजूबाजूला असणाऱ्या केमिकल उत्पादन करणाऱ्या उद्योगांना तात्काळ सूचना करून हे पाणी बंद करावे आज सकाळी नदीच्या कडेला शेकडो मासे मरण पावलेले आढळून आल्यामुळे शिदोड येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे