श्रीराम बहीर यांनी शिक्षकांचा विश्वास कमावला – राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी ) : परवा नवजीवन शिक्षक पतसंस्थेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्रीराम बहीर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक विश्वास पॅनलमधील 15 पैकी 13 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. ही पतसंस्था शिक्षकांची असली तरी काही राजकीय मंडळींनी प्रतिष्टा पणाला लाऊ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मागील पाच वर्षात श्रीराम बहीर सर आणि त्यांच्या सहकार्याने पतसंस्थेद्वारा केलेले भरीव कार्य शिक्षक बांधव विसरले नाहीत. राजकीय कटाला शह देत सुजाण शिक्षक मतदार बांधवांनी श्रीराम बहीर यांच्या शिक्षक विश्वास पॅनलमागे समर्थपणे उभे राहिले. लोकशाही मार्गाने राजकीय षड्यंत्र उधळून लावले या घवघवीत यशामागे श्रीराम बहीर यांचे प्रामाणिक कार्य आणि शिक्षक वर्गात कमावलेला विश्वास सिद्ध झाला आहे. यापुढेही श्री बहीर सर यांच्या माध्यमातून नवजीवन पतसंस्थेचे कार्य शिक्षकांच्या हिताचे असेल. नवजीवन पतसंस्था भविष्यात शिक्षकांसाठी समृद्ध वटवृक्ष व्हावी अशा शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिल्या आहेत.
आज संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे माजी मंत्री मा.बदामराव पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनतापार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के यांच्या हस्ते बीड तालुका नवजीवन शिक्षक पतसंस्था निवडणूकीत नवजीवन शिक्षक विश्वास- घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल,पॅनल प्रमुख श्रीराम बहीर आणि नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित संचालक सर्वश्री वनवे शामराव, खांडे सुमंत, वायकर गोविंद, पिंगळे आनंद, पोथरकर जितेंद्र, ढास सुरेश, कवचट दत्तात्रय, खोसे विजय, निर्मळ अंकुश, म्हेत्रे शिवनाथ, श्रीमती अडसूळ सुमित्रा तसेच प्रचार प्रमुख बहीर आक्का, प्रकाश उपरे, फुलचंद खाडे, गिरीश भावले यांच्यासह दुष्यंत डोंगरे, अजय ढाकणे, बद्रीनाथ जटाळ, राकेश बिराजदार आदि उपस्थित होते.