बीड प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधान प्रस्ताविका सामुहिक वाचन आणि 26-11 मुंबई हल्ला स्मृती दिनानिमित्त, भारत मा कि जय हो भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांच्या शौर्य गाथेचे स्मरण या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तर्फे करण्यात आले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नगर रोड बीड येथे सकाळी 11.00 वाजता संपन्न होणार आहे.अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
भारतीय संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी अधिकृत पणे स्वीकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 125 वि जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना विशेष श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. तीच परंपरा कायम ठेवत आज देशभरात भारतीय जनता पार्टी च्या वतीने संविधान सन्मान दिन साजरा केला जात आहे.तसेच 26-11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तुत्ववान वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबळे यांसारखे अनेक वीर पुत्र शहीद झाले. या वीर पुत्रांचे शौर्य गाथेचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिनाचे औचित्य साधून , भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांच्या शौर्य गाथेचे स्मरण करण्यासाठी श्री कुलदीप धुमाळे दिग्दर्शित नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमाला सुजाण नागरिकांनी बहुसंखेने उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.