केज/प्रतिनिधी : शहरातील फुलेनगर भागातील आझाद नगर येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त जी एम आझाद ग्रुप यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिरामध्ये अनेक हिंदू-मुस्लिम तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केजनगरपंचायच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,कार्यक्रमाचे अध्यक्ष केज नगरपंचायतचे गटनेते राजूभाई इनामदार तर प्रमुख पाहुणे नगरसेवक जलालभाई इनामदार, नगरसेवक सुमित बप्पा शिंदे,नगरसेवक सोमनाथ गुंड,सादिक भाई शेख, पत्रकार तात्या गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.जयंती उत्सव कमिटीच्या वतीने मान्यवरांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अंबाजोगाई येथील
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढीचे डॉ. अरुण तांदळे सहाय्यक परिचर शशिकांत पारखे, अफसर शेख,अमोल पानखंडे,शेख बाबू या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे कामकाज करुन सदरील रक्तदान शिबिर यशस्वी केले.त्याबद्दल जयंती कमिटीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी शाहरुख पटेल,असेफ पटेल,एजाजभाई,प्रेम मस्के,आकाश शिंदे,पवन बनसोड,अशोक धीवर, विवेक बनसोड,अमित बचुटे,प्रशांत झेंडे,सोनू गायकवाड,आर्यन बचुटे यासह जयंती कमिटीचे अध्यक्ष अरबाज भाई, उपाध्यक्ष पप्पू पटेल, आणी जी एम आझाद ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.