संग्रहित छायाचिञे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही वर्षापासून गैरप्रकार होत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. त्यात शुक्रवारी (ता. 19) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन एका जेसीबीचे बोगस कागदपत्र तयार केले आहेत. हा प्रकार सध्याचे आरटीओ यांच्या लक्षात आल्या नंतर शुक्रवारी (ता. 19) बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात वरिष्ठ लिपीक व एका एजंटवर फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल ह्या गेल्या वर्षाभरापासून बीड आरटीओ कार्यालयात कार्यरत असून त्यांनी गेल्या वर्षभरात अशी किती गैरकामे केली आहेत हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. यामुळे सुरेखा डेडवाल यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व बाबींची विशेष तपासणी करावी म्हणजे यापुर्वी सुद्धा त्यांनी असे प्रकार केले आहेत का? हे स्पष्ट हाईल.
बीड येथील आरटीओ कार्यालयात गेल्या काही वर्षापासून वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात येथील काही भ्रष्टअधिकाऱ्यांमुळे नागरीकांची गैरसोय होत असल्याचे अनेक प्रकार यापुर्वी सुद्धा उघड झालेले आहेत. त्यात शुक्रवारी एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून चक्क एका जेसीबीचे बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांनी जुन्या आरटीओंच्या सह्या करुन ही कागदपत्रे तयार केली आहेत. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल ह्या गेल्या वर्षभरापासून बीड मध्ये काम करत आहेत. त्यांच्या कालच्या प्रकारावरुन त्यांनी यापुर्वी सुद्धा असे गैरकामे केली असल्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. त्यांनी यापुर्वी सुद्धा असे कामे केली असतील तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर यापुढे अशी गैरकामे होणार नाही. मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरुन वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल व एजंट सय्यद शाकेर यांच्यावर बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात कलम 409, 420, 120, 468, 471 कलमान्वेय गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास बीड ग्रामिण पोलीस करत आहेत.
एजंट सय्यद शाकेर यांची सुद्धा सखोल चौकशी करा
गेल्या अनेक वर्षापासून बीड आरटीओ येथे एजंट म्हणून काम करणारे सय्यद शाकेर यांचे यापुर्वी सुद्धा अनेक प्रकार समोर आलेले आहेत. शुक्रवारी समोर आलेल्या प्रकारात त्यांनी येथील एका महिला लिपीकेला सोबत घेऊन चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन एका जेसीबीचे बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. यामुळे सय्यद शाकेर यांची सुद्धा सखोल चौकशी करुन त्यांनी जर गैरकामे केली असतील तर त्यांच्यावर सुद्धा नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे.