आमदार साहेब बस स्थानक तुमच्या हद्दीत नाही का?
बस स्थानक की समस्यांचे माहेर घर!
-बीडचे बस स्थानक देतेय प्रवाशांना रोगराईचे निमंत्रण
-संपुर्ण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य; थोडा जरी पाऊस पडला तरी येतेय तलावाचे स्वरुप
-ठिक-ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी; स्थानकाची साफसाफई हाईना
-बीड बस स्थानक प्रशासन खेळतेय प्रवाशांच्या जिवाशी; बस स्थानकात नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही
-गर्भवती महिलांसाठी असणारा हिरकणी कक्ष फक्त नावालाच
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील बस स्थानकात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचून संपूर्ण बस स्थानक परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे, थोडा जरी पाऊस पडला तरी येथील स्थानकाला तलावाचे स्वरुप प्राप्त होते, गर्भवती महिलांसाठी निर्माण करण्यात आलेला हिरकणी पक्ष तर गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे, बस स्थानक विभागाकडून साधे प्रवाशांना पिण्याची पाण्याची सोय करुन देण्यात येत नाही, बस स्थानकाचा संपुर्ण परिसर खड्डेमय झाल्यामुळे प्रवाशांना अनेक बाबींचा सामना करावा लागत आहे, यासह इतर समस्यांमुळे बीड बस स्थानक आहे का? समस्यांचे माहेर घर असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बीड मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी बीड बस स्थानकाकडे विशेष दक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा म्हणजे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
बीड शहरातील मुख्य बस स्थानक गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्यात अडकले आहे. अनेक वेळा नविन बस स्थानक निर्माण करण्यासाठी अनेक मंत्र्यांनी नारळा फोडला पण तो फक्त फोटो काढण्यासाठीच. बीड बस स्थानकाकडे संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी विशेष लक्ष देत नसल्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज याठिकाणी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सर्वात जास्त त्रास सहन कराव लागत आहे. बीड बस स्थानकातुन बस मध्ये बसून प्रवास करताना प्रवाशांना तर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बस स्थानकाची इमारत सुद्धा पावसात गळत आहे. मोठा पाऊस झाला तर संपुर्ण बस स्थानकात पाणीच पाणी असते, याच पाण्यासाठीतून प्रवाशांना वाट काढत जावे लागते. एवढ्या मोठ्या समस्या असून सुद्धा आज पर्यंत या प्रश्नाकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. यामुळे आता तरी येथील बस स्थानकाकडे लक्ष देऊन येथील बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी बीडकर करत आहेत.