बीड : जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातील ग्रामीण भागातील पुल दुरावस्थेत असून पावसाळ्यात धोकादायक बनले असुन वारंवार दुरूस्तीसाठी निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील आधिकारी केवळ पोकळ आश्वासने देऊन आंदोलनकर्ते यांची समजूत काढण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ आज दि.१८ सोमवारी रोजी भुईमुगाच्या शेंगा भाजून खात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “नुसत्याच शेंगा हाणो “आंदोलन करण्यात येऊन धोकादायक पुलांच्या दुरूस्तींची मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे,रामनाथ खोड,शेख युनुस च-हाटकर,बलभीम उबाळे,शेख मुबीन,यांनी आंदोलनात सहभाग घेऊन तहसिलदार जि.का. मंजुषा लटपटे यांना निवेदन दिले.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अवमानना;मान्सूनपूर्व धोकादायक पुलांची तपासणी व अहवाल दिलाच नाही
___
मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागातील आधिका-यांच्या बैठकीत बीड जिल्ह्य़ातील धोकादायक पुलांची तपासणी करून मान्सूनपूर्व उपाययोजना करण्यात याव्यात तसेच भविष्यात दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल अशी तंबी देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची तपासणी करून अहवाल दिलाच नाही.
मुलीचा मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ येवो अथवा पुरात माणसे वाहुन गेले तरी लोकप्रतिनिधी;प्रशासन ढीम्मच
____
पावसाळ्यात रस्त्याचा व धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर येत असून पावसामुळे अनेक तालुक्यातील गावातील रस्ते पुलांअभावी बंद होतात त्यामुळेच ग्रामिण भागातील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृतानदीवरील पुलांवरून सप्टेंबर २०२१ मध्ये बालमटाकळी येथील कृष्णा घोरपडे व त्याचा मुलगा,मुलगी दुचाकीवरून जाताना वाहुन गेले होते त्यातच त्यांचा मृत्यु झाला होता. तसेच भोजगाव येथील धोकादायक पुलावरून संत नावाच्या व्यक्तीचा पाय घसरून पाण्यात बुडुन मृत्यु झाला होता तर याच गावातील निकीता संत हिच्या आत्महत्येनंतर शवविच्छेदनासाठी पुल नसल्यामुळेच मुलीच्या वडीलांना मृतदेह खांद्यावर नेण्याची दुर्दैवी वेळ आली होती.
स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षानंतरही बोटीतुन,चप्पुद्वारे जीवघेणा प्रवास
___
गेवराई तालुक्यातील राहेरी गावातुन बानेगाव,घनसांगवी जालना जिल्ह्याकडे जाताना गोदावरी नदीवर पुल नसल्यामुळेच धोकादायक बोटीतुन प्रवास करावा लागतो तर वडवणी तालुक्यातील खळवट निमगांव धरणात बुडुन मुलींचा मृत्यु झाला होता. राजापूर गावात जाणा-या रस्त्यावर पुल नसल्यामुळे वाहतुक बंद होऊन पांढरवाडी,राजपिंपरी,देवपिंपरी,माटेगाव,खळेगाव,पौळाची वाडी,चकलंबा रोडवरील अनेक पुलांची कामे झालीच नाहीत. पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमळा)येथील ग्रामस्थांना तराफावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याठीकाणी पुलांची कामे होणे आवश्यक आहे.