बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे यांचा शनिवार दिनांक 16 जुलै रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. च्द्रकांतदादा पाटील,विधान परिषद सदस्य मा.श्री प्रवीणजी दरेकर,आ.अशिषजी शेलार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे.या सोहळ्यास बीड जिल्ह्यातील सर्व शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते व साहेबावर प्रेम करणार्या हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री.नारायणदादा काशीद यांनी केले आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असून त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार त्यांनी पाहिलेले आहेत.मराठा आरक्षणासह, मुस्लिम , धनगर व ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरून आंदोलने व मोर्चात प्रत्यक्ष सहभाग झालेले आहेत. जनतेच्या प्रश्नसाठी सभागृहात सडेतोड आक्रमक भूमिका घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद ही संघटना स्थापीत करुन एनडीएचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रातील विधानसभेत तीन आमदार निवडून आणण्याची कर्तबगारी विनायकराव मेटे साहेबांच्या नेतृत्वात झालेली आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनविन प्रकल्प, नदीजोड प्रकल्प, रस्ते, लहान मोठी धरणे इत्यादीसाठी विधान परिषदेत आवाज उठवून मंजूर करून घेतलेली आहेत.बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मेटे साहेबांचे योगदान फार मोठे आहे.जनतेच्या व समाजाच्या प्रश्नासाठी सभागृहात ते जेवढे आक्रमक दिसतात तेवढेच त्यांचे राजकीय पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेलं अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.विनायकराव मेटे हे होय. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म होऊन अथांग अपेक्षा उराशी बाळगून त्या दिशेने झेप घेऊन त्या पूर्ण करता येतात असा आदर्श महाराष्ट्रातील तमाम तरुणांच्या समोर ठेवणारे मा.आ. विनायकराव मेटे हे होय. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. शरदचंद्रजी पवार साहेबां पर्यंत तसेच स्व.विलासरावजी देशमुख साहेबा पासून माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या पर्यंत,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे यांच्या पासून छत्रपती युवराज संभाजीराजे तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वासोबत जिव्हाळ्याचे व मैत्रीपूर्ण सबंध मा.आ.विनायकराव मेटेंचे आहेत हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे . मराठा आरक्षणाच्या चळवळीतील शिर्षनेतृत्व म्हणून महाराष्ट्रातील अवघा मुलुख त्यांना ओळखतो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील या नेतृत्वाचा अभिष्टचिंतन सोहळा मुंबई येथे येत्या शनिवारी संपन्न होत आहे .
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही मा.आ.विनायकराव मेटे यांचा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम मुंबई येथे पार पडत आहे.गेल्या अनेक वर्षापासून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख, लोकनेते कै गोपीनाथराव मुंडे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, विद्यमान उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील यापूर्वी मा.आ.विनायकराव मेटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांच्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक केले होते. या वर्षिच्याअभिष्टचिंतन सोहळ्यास सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे .तरी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व साहेबावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक या सर्वांनी मुंबईमधील या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद यांनी केले.