मुंबईतील नंदनवन भवनात मुख्यमंत्र्यांचा शिवेसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अॅड.चंद्रकांत नवले यांच्यावतीने यथोचित सत्कार
बीड (प्रतिनिधी)ः- माजी मंत्री प्रा. सुरेश नवले आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अॅड. चंद्रकांत नवले यांचा राजकीय संघर्ष आणि निष्ठा मी जवळून पाहिलेली आहे. शिवसैनिकांच्या हक्कासाठी जेंव्हा राजकीय भूकंप झाला त्यावेळी प्रा.सुरेश नवले मित्र मंडळ मराठवाड्यातून सर्व प्रथम पाठीशी उभे राहिले याची जाणीव निश्चित आहे. भविष्यात नवले मित्र मंडळाच्या पाठीशी बीड मतदार संघाच्या विकासासाठी संपूर्ण ताकद उभी करेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे नुतन मुख्यमंत्री श्री.ना. एकनाथराव शिंदे यांनी दिली.
शिवसेनेचे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी बीड मतदार संघात शिवसेनेचा 1990 साली पहिला भगवा झेंडा फडकवला. हा विजय सहज सोपा नव्हता, या संघर्षात त्यांच्या पाठीशी त्यांचे बंधू शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अॅड. चंद्रकांत नवले यांचा मोठा वाटा आहे. मी देखील धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी पायिक असून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर प्रेरीत झालेला सैनिक आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातील बीड जिल्हयात 1989 साली नवले बंधूंच्याच पुढाकारातून यशस्वी जाहीर सभा झाली होती. 1987 ते 1990 या काळात शिवसेनेचा विचार घराघरात पोहचावा यासाठी दै. सामना हे वृत्तपत्र मी स्वत: वाटप केले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शासकीय नोकरी ज्युनियर इंजिनिअर म्हणून लागलेली असतांना केवळ शिवसेना पक्ष वाढीसाठी नोकरीला तिलांजली दिली. 1990 आणि 1995 मध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यशस्वी सभेचे आयोजन देखील समर्थपणे पेलले. बीड विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा 1995 साली शिवसेनेचा भगवा झेंडा प्रा. सुरेश नवले यांच्या विजयाने फडकवला. त्यानंतर बीड नगर परिषद, पंचायत समिती बीड, जिल्हा परिषद मध्ये देखील सत्तांतर करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. प्रा. सुरेश नवले दोन वेळा आमदार आणि मंत्री असतांना बीड मतदार संघामध्ये भूतो न भविष्यती अशी विकास कामे केली. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती, नाळवंडी रोडवर 220 के.व्ही. प्रकल्पाची निर्मिती, डोकेवाडाचा मध्यम प्रकल्प, जायकवाडी येथून बीडला पाणीपुरवठा योजनेची मंजूरी, बीड – परळी रस्ता रूंदीकरण, अद्यावत बीड जिल्हा रूग्णालयाची नवीन इमारत बांधकाम, जे.जे. हॉस्पिटलच्या धरतीवर अति दक्षता विभाग, बीड मतदार संघात सर्कल वाईज प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, व 132 के.व्ही. वीज उपकेंद्र, व्यायामशाळा, ग्रामीण भागात रस्ते, शाळांचे सुशोभिकरण, विधंन विहीर, जलसिंचन, शेतकर्यांना सुरळीत वीज पुरवठा, घरकुल योजना, ग्रामीण भागांना शहरी भागाला जोडण्यासाठी शेकडो पुलांची निर्मिती, बीड जिल्ह्यात ज्ञान मंदिराची उभारणी यात प्रामुख्याने आश्रमशाळा, निवासी शाळा, प्राथमिक ते माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, बालग्रहे, बालसदन स्वत:च्या संस्थेकडे न ठेवता सर्व समाजातील लोकांना मंजूर करून दिली. मात्र 1998 साली प्रा. सुरेश नवले मंत्री असतांना त्यांनी स्वाभिमानाला ठेच लागल्याने मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याच क्षणी मी देखील शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. परंतु मनामध्ये बाळासाहेबांवरचे असलेले प्रेम इतर पक्षामध्ये रमू देत नव्हते म्हणून आग्रह करून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांना पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडले. शिवसेनेत प्रवेश घेतला मात्र शिवसेनेने 2004 साली विधानसभेची उमेदवारी डावलली. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधान परिषदेवर संधी मिळाल्याने पुन्हा एकदा बीड मतदार संघासह जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देता आले. दरम्यान 2014 साली मी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रीय झालो. पक्षाने मला बीड जिल्हा सह संपर्क प्रमुख म्हणून संधी दिली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आय पक्षा समवेत अनैसर्गिक युती करून महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पदभार स्विकारला. मात्र अडीच वर्षामध्ये ही अनैसर्गिक आघाडी सामान्य शिवसैनिकांच्या मनात बोचत होती. हा ज्वाला धर्मवीर आनंद दिघे यांच्या निष्ठावंत तथा बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक एकनाथराव शिंदे यांच्या रूपातून भूकंप होवून बाहेर पडला. शिवसैनिकांसाठी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याने मराठवाड्या सर्व प्रथम माजी मंत्री प्रा. सुरेश नवले मित्र मंडळाने बीड मतदार संघात फटाक्यांची अतिषबाजी करत, गुलालाची उधळण करून स्वागत केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सर्वसामान्य शिवसैनिक असलेल्या मा.श्री. एकनाथराव शिंदे यांना संधी मिळाल्यानंतर बीड मतदार संघात ढोल ताशाच्या गजरात, पेढे भरवून स्वागत करण्यात आले. भविष्यात मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथराव शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी बीड जिल्हयातून माजी प्रा.सुरेश नवले मित्र मंडळ सोबत राहील अशी ग्वाही मुबंई येथील नंदनवनभवन येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सत्कारानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड. चंद्रकांत नवले यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी सत्कार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या उभारणीमध्ये महानगरातून आम्ही आणि मराठवाड्यासारख्या मागास आणि ग्रामीण भागातून माजी मंत्री प्रा.सुरेश नवले सारखे निष्ठावंत उभे राहीले. प्रा. नवले यांच्या पाठीशी त्यांचे बंधू अॅड.चंद्रकांत नवले खंबीरपणे उभे राहीले म्हणून मराठवाड्यात बीड जिल्हयातून पहिला भगवा फडकू शकला. नवले यांचा संघर्ष आणि त्यांची निष्ठा मी जवळून पाहिलेली आहे येणार्या कार्यकाळात नवले बंधूंच्या पाठीशी शिंदेसेनाची ताकद पूर्णपणे राहील बीड मतदार संघात विकासाची भरघोस कामे नवलेंच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या सत्कार सोहळ्या प्रसंगी बीडचे भूमिपूत्र पुणे येथील संजय झाडे पाटील, हरिभाऊ जगताप उपस्थित होते.