डाॅ. भारतभुषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांचा अंतरिम जामीन जिल्हा सञ न्यायलयाने आज फेटाळला
प्रारंभ
बीड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात डाॅ. भारतभुषण क्षीरसागर व डाॅ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी आज (ता. १९) जिल्हा सञ न्यायलयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटळाला आहे. चार दिवसाची मुदत देण्यात यावी अशी मागणी आज केलेल्या अर्जात करण्यात आली होती. परंतू अर्ज फेटाळल्यामुळे डाॅ. भारतभुषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जमिनीच्या वादावरुन क्षीरसागर परिवारात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार झाला होता. यानंतर दोन्ही गटावर गुन्हे नोंद करण्यात आले होते. यात माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर व डाॅ.योगेश क्षीरसागर यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच प्रकरणी आज येथील जिल्हा सञ न्यायालयाने डाॅ.भारतभुषण क्षीरसागर व डाॅ. योगेश क्षीरसागर यांचा अंतरिम जामीन आज फेटाळला आहे.यात चार दिवसाची मुदत देण्याची मागणी करण्यात आली होती. पण या अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे पिता—पुञाच्या अडचणीत भर पडली आहे.