प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे जात असल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. या उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी येथील नागरीक मोठ्या प्रमाणात फळांना जास्त पसंती देऊ लागले आहेत. परंतु कमी कालावधित जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काही व्यापारी आणि काही फळ उत्पादकांकडून फळे पिकवण्यासाठी रासायिनक पदार्थांचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बाजारातुन फळे खरेदी करताना नागरीकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
पैसा कमवण्यासाठी अनेक जण चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असतात. परंतु याचा इतरांना मात्र मोठा तोटा सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षापासून कृत्रिमरित्या फळे पिकवण्याचा फंडा सुरु करण्यात आला आहे. ही फळे खाल्यानंतर त्वचारोग, पाटाचे विकार आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे फळे खरेदी करताना ते नैसर्गिकरित्याच पिकवलेली आहेत, याची खात्री करणे गरजेचे आहे. लवकर फळे पिकावीत यासाठी बंदी असलेल्या रसायनांचा वापर काही जण करु शकतात. ही फळे खाल्ली किंवा त्यांचा रस प्राशन केला, तर त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने धडक मोहिम हाती घेऊन कृत्रिमरित्या फळे पिकवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे. नैसर्गिकरित्या फळ पिकण्यासाठी किमान आठ ते 15 दिवस लागतात. आंबा पिकवण्यासाठी पुर्वी स्वतंत्र्य खोली असायची. त्याला माजघर म्हटले जायचे. कच्चा आंबा अर्थात कैरी झाडल्यानंतर याच घरात ठेवण्यात येत असे. परंतु आज काही जण कृत्रिमरित्या आंबा पिकवत आहेत. यामुळे फळे खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
अंबा : नैसर्गिंकरित्या पिकवलेला आंबा हातात घेतल्यावर तो अतिशय नरम जाणवतो. तसेच आंब्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात तर कृत्रिमरित्या पिकवलेला अंबा थोडा कडक, चमकदार व गुळगुळीत असतो. आंबा घेताना कायम त्याच्या देठाकडील भागाचा वास घ्या, नैसर्गिकरित्या पिवलेल्या आंब्याचा देठाचा नेहमीच गोड सुवास येत असतो. अशा प्रकारे अंबा खरेदी करताना खबरदारी घेणं गरजेचे आहे.
टरबूज ; स्टेरॉईड चे इंजेक्शन दिलेल्या दरबुजाचे फळ लालबुंद असले तरी कापल्यानंतर आतील गरांत तंतुचे जाळे तयार झालेले असते. ते भरीव राहता तुटक-तुटक असते. यावरुन इंजेक्शन दिलेले टरबूज आपल्याला ओळखता येते.
सफरचंद : मेणलावलेल्या सफरचंदांना चकाकी असते. सफरचंद नैसर्गिकरित्या पिकवलेले असेल तर चमकत नाही. शिवाय सफरचंदाला पिटोशिन इंजेक्शन दिलेले असेल तर त्या ठिकाणी बारीक डाग पडलेले असतात. काही व्यापारी तेथे ओके टेस्टेड एक्स्पोर्ट क्वालिटी आदी नावांचे स्टीकर लावत असतात.
द्राक्ष : इथेलिनच्या साहाय्याने पिकवलेल्या द्राक्षांना दवाखान्यातील स्पिरिटसारखा वास येतो. खायला तीही गोड लागतात. मात्र, शरीरासाठी ते खुप हानिकारक असतात.
केळी : केली कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी काहीजण इथिलीन हे रसायन वापरतात. त्यामुळे पिकवलेली केळी ही पिवळीधमक दिसते. पण, खायला फारशी गोड नसते.